Sanjay Raut : ‘…तर बाळासाहेबांनी मिठी मारली असती’, अमित शाहांना संजय राऊतांचा तो तुफान टोला
Sanjay Raut on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल संजय राऊतांवर टीका केली होती. आज राऊतांनी त्याला प्रत्युत्तर दिले. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊतांच्या ऑपरेशन सिंदूरसंबंधीत एका वक्तव्याचा आधार घेत त्यांनी नागपूरमध्ये राऊतांवर टीकास्त्र सोडले होते. आज बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती, असे शाह म्हणाले होते. त्यावर आज खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. त्यांना शाह यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
राऊतांचा घणाघात
अमित शाह यांच्या विधानाचा समाचार घेताना राऊतांना हल्लाबोल केला. “प्रेसिडेंट ट्रम्प ने पुतीन बाबतीत आज एक उल्लेख केला त्यांचा डोकं ठिकाणावर नाही पुतीनच मला असं वाटतं आपल्या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तोच शब्द लागू पडतो. पहलगाम मध्ये जे झालं 26 माय भगिनींच्या कपाळावरचा कुंकू फुसला गेला त्याबद्दल सर्वात आधी अमित शहा यांचा राजीनामा व्हायला पाहिजे हे आम्ही वारंवार सांगत आहोत. या सगळ्याला जबाबदार अमित शाह आहेत. गृह खात्याचा काम हे अत्यंत अपयशी बिनडोक अशा पद्धतीचा आहे. आधी 40 जवान मारले गेले त्यानंतर काल सव्वीस महिलांच्या कपाळावरचा कुंकू पुसल गेला याला जबाबदार कोण याला जबाबदार अमित शहा गृहमंत्री आहेत आणि आम्हाला शिकवतात महाराष्ट्रात येऊन”, अशी टीका राऊतांनी केली.
महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका
“अमित शहा यांचा राजीनामा आणि राजीनामा घेण्याचे जबाबदारी ही नरेंद्र मोदी यांची होती आणि हे सांगत आहेत आम्हाला आज जर शिवसेनाप्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मी वाचवलं कोणाला खुनातून कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता. यांनी काय केलं ऑपरेशन सिंदूर प्रेसिडेंट ट्रम्प च्या धमकी ना पाकिस्तान बरोबर युद्धातून माघार घेतली आणि तुम्ही आता ऑपरेशन सिंदूरचा राजकारण करत आहात. अमित शहा थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्या आणि महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका हे स्पष्टपणे आम्ही सांगतो”, असा इशारा राऊतांनी दिला.
कशाला मिठी मारली असती?
“काय करताय तुम्ही? काय दिवे लावले? उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाही. तुमच्या बेईमानीला आम्ही सगळे तुम्हाला शरण गेलो नाही हा तुमचा राग आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडली त्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला काय मिठी मारली असती का हा तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत आहात मिस्टर अमित शाह”, असे प्रत्युत्तर आज संजय राऊत यांनी अमित शाह यांना दिले.
