बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो, ठाण्यातून सुषमा अंधारे यांच्यावर कुणाची टीका?

| Updated on: Nov 23, 2022 | 8:37 AM

दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं, अशी टीका सुषमा अंधारे यांच्यावर करण्यात आली.

बोलक्या पोपटाला जे शिकवतो, तेच बोलतो, ठाण्यातून सुषमा अंधारे यांच्यावर कुणाची टीका?
नरेश म्हस्के
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणेः बोलक्या पोपटाला आपण जे शिकवतो, तेच तो बोलतो. त्याला अर्थ, निष्ठा, बांधिलकी, विचार यांच्याशी संबंध नसते, असे या बाईचे झाले आहे, अशी थेट टीका सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर करण्यात आली आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde) नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ही घणाघाती टीका केली आहे. ठाण्यात त्यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली.

नरेश म्हस्के म्हणाले, कालपर्यंत या बाई हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या.

काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात. दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, असं चुकीचं वक्तव्य त्यांनी केलं होतं…

सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचा मुंबईतच्या निवडणुकीत जीव अडकला आहे. उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. त्यांची मते मिळावी, यासाठी त्यांच्यात सहानुभूती निर्माण व्हावी, याकरिता बिहारचा दौरा आयोजित करण्यात आला असावा.

लालू प्रसाद यादव यांनी कायमच शिवसेनेला विरोध केला आहे. बाळासाहेबांच्या विरोधात ते कायमच बोलत आले आहेत. आता हीच लोकं ठाकरेंना जवळची वाटत आहेत, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.

मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटतात, तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते. आता तर हे लोक स्वतःहून इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांना भेटत आहे, काय वेळ आली आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.