
मुंबई :ईडीकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंत्र्यांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री आणि काँग्रेसचे मंत्री यांची शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक घेतली. या बैठकीला शिवसेना मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आज अतिशय पहाटे आमचे सहकारी मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तपास केल्यानंतर ईडीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर अटक करण्यात आली. दोन्ही बाजूनं कोर्टात युक्तिवाद आणि चर्चा झाली. 1992 च्या घटना, 1999 साली त्या जागेचा करार, त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. ज्यावेळी पीएमएलएचा जन्म नव्हता. त्यावेळची घटना आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक लोक जेलमध्ये गेले, फाशी झाली.
गेल्या 30 वर्षात नवाब मलिक यांचं नाव आलं नाही. नवाब मलिक भारत सरकारच्या अन्यायाच्या धोरणाविरोधात बोलतात. निडरपणे ते बोलतात त्यांचं तोडं बंद करण्यासाठी हा प्रयत्न आहे. एफआयआर झाल्याशिवाय ईसीआयर होत नाही. 14 फेब्रुवारी रोजी ईसीआयआर एनआयएकडून करण्यात आला. त्यानंतर त्यावर अटक करण्यात आली.
नवाब मलिकांच्या वकिलांनी आरोप फेटाळले आहेत. सलीम पटेल आणि सलीम फ्रुट आहे. सलीम फ्रुट आहे तो वारला आहे. हसीना पारकर वारल्या आहेत. वडाची साल पिंपळाला लावयाची आणि अटक करायची आणि तिन्ही पक्षांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
या प्रकाराचा आम्ही निषेध करतो. लोकशाहीविरोधी हा प्रकार आहे. बोलेल त्याचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न आहे. एकत्रितपणे तिन्ही पक्ष याविरोधात लढणार, जनतेत जाणार आहोत. राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही, नारायण राणे यांना देखील अटक झाली होती , त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं का? जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही, केंद्राची यंत्रणा सांगतेय, विशिष्ट हेतूनं सांगतेय म्हणून राजीनामा घ्यायला पाहिजे हे आम्हाला पटत नाही, जोपर्ंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही.
इतर बातम्या:
नोटीस न देता मलिकांच्या ED चौकशीला गृहमंत्र्यांचा आक्षेप; कायदा काय म्हणतो, सांगताहेत उज्ज्वल निकम…