AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : चुकीला माफी नाहीच, वेस्ट इंडिजशी भिडण्यापूर्वी कॅप्टन सूर्या नाराज? दिला मोठा इशारा

टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 8 मध्ये काल झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवून भारताने सेमीफायनलमध्ये पोहोण्याच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु विजय मिळून देखील कर्णधार सूर्यकुमार यादव समाधानी नव्हता. चेपॉक येथे 256 धावा करूनही भारताने प्रतिस्पर्धी संघाला 184 धावा करू दिल्या. यामुळे कॅप्टन नाराज असून पुढच्या सामन्यापूर्वीच त्याने मोठा इशारा दिला आहे.

Team India : चुकीला माफी नाहीच, वेस्ट इंडिजशी भिडण्यापूर्वी कॅप्टन सूर्या नाराज? दिला मोठा इशारा
टीम इंडियाच्या कामगिरीवर कॅप्टन असमाधानी ?Image Credit source: social media
| Updated on: Feb 27, 2026 | 10:03 AM
Share

आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्डकपच्या चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने काल झिम्बाब्वेवर शानदार विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडिया सेमीफायनमध्ये पोहोचण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र असं असलं तरीही , झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवूनही भाराताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा काही फार खुश दिसल नाही. उलट संघाच्या गोलंदाजीमुळे तो असमाधानीच होता. विजय मिळवणं गरजेचं आहेत. पण नॉकआीट सामन्यापूर्वी टीमला आणखी चांगली तयारी करून उत्तम खेळ करावा लागेल, असंही तो म्हणाला.

काल, गुरुवार (26 फेब्रुवारी) भारतीय फलंदाजांनी उल्लेखनीय वापसी केली आणि 4 गडी गमावून झिम्बाब्वेसमोर 256 धावांचा डोंगर उभा केला. सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघासाठी कालची कामगिरी खूप महत्त्वाची होती.

मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे कधीही जिंकण्याच्या स्थितीत दिसत नव्हते, तरीही त्यांनी 6 गडी गमावत 184 धावा केल्या, टफ फाईट दिली. सहावा गोलंदाज म्हणून आलेल्या शिवम दुबेच्याबलिंगवर 2 षटकांत 46 धावा चोपण्यात आल्या. त्यामुळे कर्णधार यादव चिंतेत पडला.

कॅप्टन झाला नाराज ?

मॅच जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादवची नाराजी साफ झळकत होती. सामन्यानंतर बोलताना त्याने यावर स्पष्ट मत मांडलं, “आम्ही बॉलने अधिक चांगले कामगिरी करू शकलो असतो. विजय हा विजय असतो, परंतु आम्हाला आमच्या आणखी पर्यायांसह, अजून थोडं स्मार्ट बनण्याची गरज आहे आम्ही वेस्ट इंडिजविरुद्ध आमच्या चुका सुधारू.” असंही त्याने नमूद केलं.

1 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर भारताचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. सेमीफायनमध्ये पोहोचायचं असेल तर भारतासाठी हा करो या मरो असाच सामना ठरणार आहे.

झिन्बाब्वेसमोर भारताची कामगिरी

या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी संघाने भूतकाळातील चुका मागे टाकण्याचा प्रयत्न केला, असंही कर्णधार सूर्याने सांगितले. “आम्ही लीग स्टेज किंवा मागील सामन्याबद्दल जास्त विचार केला नाही. आमच्या व्हिडिओ ॲनलिस्टने गेल्या वर्षभरातील आमच्या सकारात्मक कामगिरीचे प्रेझेंटेशन तयार केलं. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास मिळाला आणि आम्ही पूर्ण स्पष्टतेने मैदानात उतरलो होतो” असं त्याने नमूद केलं. गोलंदाजीबद्दल चिंता असली तरी कॅप्टनने फलंदाजांचे मनापासू कौतुक केलं. टॉप ऑर्डरपासून ते सातव्या क्रमांकापर्यंत सर्वांनी चांगलं योगदान दिल आणि कामगिरी जवळजवळ परिपूर्ण होती, असं म्हणत त्याने समाधान व्यक्त केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...