‘पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून 2015 मध्ये रान उठवणारे मोदी आता काहीच बोलत नाहीत’

| Updated on: May 27, 2021 | 11:30 AM

शेवटी काय 'बदनसीब जनता' असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. | Nawab Malik

पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून 2015 मध्ये रान उठवणारे मोदी आता काहीच बोलत नाहीत
नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

मुंबई: देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी 2015 मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु, 2021 मध्ये पेट्रोलच्या दराने (Petrol rates) शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. (NCP leader Nawab Malik take a dig at PM Narendra Modi)

जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती. मात्र, मोदींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही उलट पेट्रोल – डिझेलचे दर वाढवून ठेवले आहेत. याच दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी मोदींना 2015 मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना आता पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे अशा आशयाचे ट्विट करत नवाब मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल केला.

पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर 2015 मध्ये बोलणारे मोदी 2021 मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यात पेट्रोलची शंभरी, तुमच्या शहरातले ताजे दर काय?

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. त्यातच गेल्या काही दिवसात देशात इंधनाची दरवाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महागाईचा भडका उडालेला पाहायला मिळत होतो. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशभरातील पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शहरात पेट्रोलने शंभरी गाठली आहे. तर डिझेलच्या दराने नव्वदी पार केली आहे.

राज्यात पेट्रोलची शंभरी गाठणारे जिल्हे

अमरावती – ₹ 100.49
औरंगाबाद – ₹ 100.95
भंडारा – ₹ 100.22
बुलडाणा – ₹ 100.29
गोंदिया – ₹ 100.94
हिंगोली – ₹ 100.69
जळगाव – ₹ 100.86
जालना – ₹ 100.98
नंदूरबार – ₹ 100.45
उस्मानाबाद – ₹ 100.15
रत्नागिरी – ₹ 100.53
सातारा – ₹ 100.12
सोलापूर – ₹ 100.10
वर्धा – ₹ 100
वाशिम – ₹ 100.34

(NCP leader Nawab Malik take a dig at PM Narendra Modi)