25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी, पण आरोप करणारेच ‘बेपत्ता’, एनसीबीचं मीडियाद्वारे समन्स

| Updated on: Oct 27, 2021 | 7:29 PM

25 कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर हजर व्हावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलंय. तर, के.पी.गोसावी यानं देखील एनसीबी समोर येऊन बाजू मांडावी,असंही सिंह म्हणाले.

25 कोटीच्या डीलवर वानखेडेंची 4 तास चौकशी, पण आरोप करणारेच बेपत्ता, एनसीबीचं मीडियाद्वारे समन्स
Gyaneshwar Singh
Follow us on

मुबई : क्रुझवरील ड्रग्ज रेड प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यानं के. पी.गोसावी आणि समीर वानखे़डे यांच्यावर आरोप केले होते. समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सही घेतली, असं प्रभाकर साईल यानं म्हटलं होत. प्रभाकर साईल यांच्या 25 कोटींच्या आरोपासंदर्भात समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवण्यात आला, असं एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं. मात्र, 25 कोटींच्या डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांनी उद्या किंवा परवा एनसीबीसमोर हजर व्हावं, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलंय. तर, के.पी.गोसावी यानं देखील एनसीबी समोर येऊन बाजू मांडावी,असंही सिंह म्हणाले.

ज्ञानेश्वर सिंह नेमकं काय म्हणाले?

प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपानंतर आज पाच सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली. आम्ही इथल्या युनिटला विनंती केली होती की, जे मुख्य पंच आहेत प्रभाकर साईल आणि के. पी. गोसावी यांना नोटीस पाठवली जावी त्यांनी मीडियात जे काही तथ्य सांगितले आहेत ते समितीपुढे मांडावे. पण आमच्या प्रयत्नानंतरही त्यांना नोटीस पाठवता आलेली नाही, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले. मी मीडियाच्या माध्यमातून के पी गोसावी आणि प्रभाकर साईल यांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन करतो. त्यांनी आपली बाजू मांडावी.

समीर वानखेडेंचा जबाब नोंदवला

आम्ही आज समीर वानखेडे यांचा जवळपास साडेचार तास जबाब नोंदवला. येत्या काळात त्यांची आणखी काही मदत घेतली जाईल. या तपासाला पुढे चालू राहू द्यावं. गोसावी आणि प्रभाकर साईल यांनी तपासाला सहकार्य करावे. आमच्याकडे असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न झाला. एकाच्या घराला टाळा होता. तर दुसऱ्याचा पत्ता तपासला जातोय. त्यामुळे त्यांना नोटीस पोहोचली नाही. त्यांनी उद्या-परवा या दोन दिवसात वांद्र्यात सीआरपीएफ मेस येथे येऊन आपली बाजू मांडावी, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले.

प्रत्येक साक्षीदाराला बोलावलं जाणार

एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील प्रत्येक साक्षीदाराला चौकशीसाठी बोलावलं जाईल, असं ज्ञानेश्वर सिहं म्हणाले याशिवाय प्रत्येक गोष्ट सांगता येणार नाही, असं देखील ते म्हणाले.

इतर बातम्या:

Maharashtra Cabinet : महानगरपालिका, नगरपालिकांची सदस्यसंख्या वाढ, रोहयोतून 2 लाख किमीच्या रस्त्यांची कामं, ठाकरे सरकारचे निर्णय एका क्लिकवर

नवाब मलिकांनी ट्विट केलेलं पत्र कुणी लिहिलं? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

NCB Officer Gyaneshwar Singh said Prabhakar Sail and K P Gosavi present for enquiry and we have recorded statement of Sameer Wankhede