AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार? शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार नाराज आहेत का? तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकीच कुणीतरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

सुप्रिया सुळे याच राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होणार? शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 10, 2023 | 6:19 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा केली. याशिवाय शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली. या मोठ्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या नियुक्तीवर अजित पवार नाराज आहेत का? तसेच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकीच कुणीतरी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होईल का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “नाही, नाही. राष्ट्रवादी अध्यक्षपदाची जागा अजून खाली झालेली नाही. ही जागा खाली झाल्यावर विचार केला जाईल”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“जयंत पाटील हे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार हे महाराष्ट्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर आज महाराष्ट्रात महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुळे यांची निवड करण्यामागील कारण म्हणजे त्यांच्यावर अशी कोणतीही मोठी जबाबदारी नव्हती. याशिवाय त्यांची जबाबादारी घेण्याची तयारी होती. त्यामुळे कोण खूश आणि कोण खूश नाही ही गोष्ट एकदम चुकीचा आहे. ज्याची निवड झाली त्यांचं नाव सिनियर लोकांनी गेल्या एक महिन्यांपासून घेतलं होतं. त्याचा निर्णय आज झालाय”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले?

“दोन गोष्ट आहेत. या देशाची रचना पाहिल्यानंतर, तीन, चार, पाच जे महत्त्वाची राज्य आहेत, सर्व राज्याची जबाबदारी एका व्यक्तीवर दिली तर आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून कामं वाटून घेतले आहेत जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभे निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची निवड केली गेली त्यांच्याबाबत लोकांची मागणी होती की, त्यांना जबाबदारी देण्यात यावी. त्याचा विचार करुन जबाबदारी देण्यात आली आहे. एक मागणी होती किंवा माझं स्वत:चं मत होतं की आता इतरांच्या हाती जबाबदारी सोपवावी. पण इतर पक्षांनी राजीनाम्याला विरोध केला. अन्य सहकारी मला विविध राज्यांसाठी काम करतील तर मला मदत होईल”, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा