महाराष्ट्रातील या शहरात मिळते एका लाखाचे पान, काय आहे त्या लाखमोलाच्या ‘स्पेशल डे’साठी असणाऱ्या पानात

Mumbai News: नौशाद यांनी एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांच्याकडे अनेक नोकरीच्या ऑफर आल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सुद्धा ऑफर मिळाली. परंतु त्यांनी आपला पारंपारीक व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या दुकानाला नाव ‘द पान स्टोरी’ दिले.

महाराष्ट्रातील या शहरात मिळते एका लाखाचे पान, काय आहे त्या लाखमोलाच्या स्पेशल डेसाठी असणाऱ्या पानात
मुंबईत मिळणारे लाखाचे पान
| Updated on: Aug 20, 2024 | 1:24 PM

पान खाणे आरोग्यासाठी चांगले असते. आयुर्वेदेताही पान खाण्यास महत्व दिले आहे. पान खाल्यामुळे तोंडात लाळेचे उत्पादन वाढते. पचनक्रिया चांगली राहते. यामुळे अनेक ठिकाणी जेवणानंतर पानाचे सेवन केले जाते. मग मोठी शहरे असो की छोटी गावे पानाचे दुकान सर्वत्र मिळणार आहे. या पानात चॉकलेट पान, फायर पान, आइस स्मोक पान, खोकल्यासाठी विशेष पान असे प्रकार आहे. त्याच्या किंमती तुम्हाला 10-20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत असणार असे वाटत असेल.

काही विशेष पान 1000 रुपयांना मिळतात. परंतु एक लाख रुपयांना पान मिळत असेल असे सांगितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु मायनगरी मुंबईत एका लाख रुपयांचा पान मिळतो. म्हणजेच तुमच्या आयफोनपेक्षा जास्त किंमत या पानाची आहे.

काय आहे त्या पानात

मुंबईत एमबीए पदवीधर असलेला नौशाद शेख यांचे पानाचे दुकान आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपयांचे पान मिळू शकते. हे पान नवविवाहित नवरा-नवरीसाठी आहे. मधुचंद्राच्या रात्री ते पान खाल्यानंतर त्या जोडप्याचा आनंद द्विगुणीत होते, असे नौशाद शेख म्हणातात. हे पान जेव्हा तयार होऊन जाते तेव्हा त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. नौशाद यांनी एका लाखाच्या या पानाला ‘फ्रेग्रेंस ऑफ लव’ नाव दिले आहे. या पानाचे प्रिंस आणि प्रिंसेज नावाचे दो बॉक्स असतात. त्याच्यावर सुवासिक अत्तर, तसेच केशर शिंपडले जाते. या पॅक बॉक्ससोबत संगमरवरी बनवलेल्या ताजमहालची प्रतिकृती भेट म्हणून दिली जाते.

नोकरीच्या ऑफर फेटाळल्या

नौशाद यांनी एमबीएची पदवी घेतल्यानंतर त्यांच्याकडे अनेक नोकरीच्या ऑफर आल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या सुद्धा ऑफर मिळाली. परंतु त्यांनी आपला पारंपारीक व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या दुकानाला नाव ‘द पान स्टोरी’ दिले. आज एमबीए झालेले नौशाद एक लाख रुपयांचा पान विकत आहे. मुंबईमधील माहीममध्ये त्यांचे ‘द पान स्टोरी’ आहे. त्यांच्या या फोनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.