बुलेट ट्रेन महाराष्ट्र को गुजरात से जोडेगी तोडेगी नही; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण; ‘मविआ’मुळे प्रकल्पाला उशीर

राज्यात राबवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक विकास होणार असून त्यामुळे राज्याला आर्थिक पाठबळ मिळणार असून त्याचा मोठा महाराष्ट्राला होणार आहे. बुलेट ट्रेन राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेल.

बुलेट ट्रेन महाराष्ट्र को गुजरात से जोडेगी तोडेगी नही; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे स्पष्टीकरण; मविआमुळे प्रकल्पाला उशीर
| Updated on: Jul 31, 2022 | 12:34 AM

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यामुळे बुलेट ट्रेनच्या कामाला बुलेट ट्रेनच्याच (Bullet train) गतीने काम होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी व्यक्त केले. आज त्यांनी बीकेसी वांद्रे (BKC Bandra) येथील बुलेट ट्रेन साईडची पाहणी करुन या कामाविषयी त्यांनी जाणून घेतले. यावेळी त्यांनी सांगितले महाराष्ट्रात आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे रेल्वेंच्या कामाला गती येणार आहे. शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यामुळेच आणि पहिल्या प्रथम त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडून परवानग्या मागण्यात आल्याने परवानग्या दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव

राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी जोरदार चर्चा करण्यात येत असल्यातरी त्यावर प्रखर टीकाही केली जात आहे. राज्यातील विरोधी पक्षाकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर टीका होत असून बुलेट ट्रेनमुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. त्याविषयी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, बुलेट ट्रेन महाराष्ट्र को गुजरात से जोडेगी तोडेगी नही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बुलेट ट्रेनमुळे विकासाला चालना

राज्यात राबवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेनमुळे विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक विकास होणार असून त्यामुळे राज्याला आर्थिक पाठबळ मिळणार असून त्याचा मोठा महाराष्ट्राला होणार आहे. बुलेट ट्रेन राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास मोठा हातभार लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितेल.

 कामाला थोडा वेळ लागणार

महाराष्ट्र-गुजरात असा बुलेट ट्रेनचा मार्ग असल्याने आणि मार्ग मोठा असल्याने या कामाला थोडा वेळ लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समुद्राच्या खालून बोगदा बनणार आहे त्यामुळे बुलेट ट्रेनचे हे काम किचकट काम असणार आहे त्यामुळे वेळ लागणार आहे असंही त्यांना स्पष्ट सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमुळे प्रकल्प सुरू होण्यास वेळ झाला  असं सांगत प्रकल्प उशीर झाल्याचे सांगत त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्यात आले.