स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते, संजय राठोडांच्या मुसक्या आवळून चौकशी करा: चित्रा वाघ

| Updated on: Feb 23, 2021 | 1:04 PM

बंजारा समाजातील अनेक नेते मला फोन करुन याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. | Chitra wagh

स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्याला जात नसते, संजय राठोडांच्या मुसक्या आवळून चौकशी करा: चित्रा वाघ
Chitra Wagh_ Sanjay Rathod
Follow us on

मुंबई: स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले. संजय राठोड ज्या समाजाचे आहेत पूजा चव्हाणही त्याच समाजातील होती. आमच्या लेखी जातीला महत्व नाही. बंजारा समाजातील अनेक नेते मला फोन करुन याप्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे सांगत असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला. (BJP leader Chitra wagh slams Sanjay Rathod)

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी मंगळवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राठोड आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली. एरवी पोलीस संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या झाल्यास अगदी आजुबाजूच्या लोकांचीही पोलीस ठाण्यात चौकशी करतात. मात्र, पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी असलेल्या संजय राठोड यांची चौकशी न करताच महिला आयोग व मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. हे कसे होऊ शकते, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

‘पोलिसांनी त्या दोघांना जुजबी चौकशी करुन सोडून दिले’

पूजा चव्हाण प्रकरणातील अरूण राठोड आणि आणखी एका संशयिताला पोलिसांनी मृत्यूच्या दिवशी जुजबी चौकशी करुन सोडून दिले. ज्यांच्यासमोर पूजाने आत्महत्या केली त्यांना पोलीस जुजबी चौकशी करुन सोडूनच कसं देऊ शकतात, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
दोन्ही संशयित फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथकं स्थापन केली. आता अरुण राठोडला पकडण्यात आले असले तरी दुसरा संशयित फरार आहे. एरवी सामान्य माणसाच्याबाबतीत अशी घटना घडल्यास पोलीस अगदी शेजारच्यांनाही उचलतात आणि पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी करतात. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप मुख्य संशयित आरोपी असलेल्या संजय राठोड यांचीच चौकशी झालेली नाही, याकडे चित्रा वाघ यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

‘आम्हाला पूजाची बदनामी करायची नाही, पण तिला न्याय मिळेपर्यंत लढणार’

पूजा चव्हाण हिचे आई-वडील आम्हाला कोणाहीविरोधात तक्रार करायची नसल्याचे सांगत आहेत. आम्हाला जगू द्या, आमची बदनामी करू नका, असे ते म्हणतात. मात्र, आम्हाला त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करायची नाही. पूजा ही फक्त तुमची मुलगी नव्हती तर ती या महाराष्ट्राची मुलगी आहे. तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढाई सुरुच ठेवू, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या :

पूजा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती, तिचे आईवडील गप्प का?; चुलत आजीचे सवाल

‘पोहरादेवी गडावर संजय राठोडांनी आपल्या कृत्याची कबुली द्यावी’

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(BJP leader Chitra wagh slams Sanjay Rathod)