फटाके की स्फोटकं, शिवसेना आमदाराच्या कार्यालयाबाहेर संशयित कार, घातपाताच्या कटाचा सुर्वेंना संशय

| Updated on: Aug 14, 2021 | 11:00 PM

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अंधेरीतील कार्यालयाबाहेर एक फटाक्यांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी मोठा घातपात घडवून आणण्याचा हा कट असावा असा संशय आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

फटाके की स्फोटकं, शिवसेना आमदाराच्या कार्यालयाबाहेर संशयित कार, घातपाताच्या कटाचा सुर्वेंना संशय
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांनी भरलेली गाडी आढळली
Follow us on

मुंबई : स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोड सुरक्षा व्यवस्था आहे. अशावेळी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या अंधेरीतील कार्यालयाबाहेर एक फटाक्यांनी भरलेली चारचाकी गाडी आढळून आली आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनी मोठा घातपात घडवून आणण्याचा हा कट असावा असा संशय आमदार प्रकाश सुर्वे यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, गाडीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. (Car full of firecrackers was found outside MLA Prakash Surve’s office in Andheri)

प्रकाश सुर्वेंना घातपाताचा संशय

आमदार प्रकाश सुर्वे यांचं अंधेरीमध्ये कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेर लाल रंगाची एक क्वॉलिस गाडी गेल्या चार-पाच दिवसांपासून उभी होती. त्यात मोठ्या प्रमाणात फटाके आढळून आले आहेत. स्वातंत्र्य दिनी कार्यालयात झेंडावंदन केलं जातं. त्यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक तिरंग्याला सलामी देण्यासाठी येत असतात. उद्या कुणी या फटाक्यांना काडी लावली असती तर काय करायचं होतं? अशाप्रकारे फटाक्यांनी भरलेली गाडी आढळून आल्यानं घातपाताचा संशय वाटतोय. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे.

गाडी मालकाची ओळख पटली

प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयाजवळ सापडलेली सुमो जीप कुणाच्या मालकीची आहे, याचा तपास लागला आहे. ती गाडी फक्त फटाक्यांनी भरलेली आहे. वाहनाचा मालक बोबडे नावाचा व्यक्ती आहे, जो जवळच्या इमारतीत राहतो. आम्ही पेटीएम क्यूआर कोड शोधू शकलो आणि स्कॅनिंगनंतर नंबर मिळाला. त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. तो दावा करत आहे की, तो रस्त्यावर व्यवसाय करतो आणि पावसामुळे त्याने फटाके वाहनात ठेवले होते. तरी सर्व बाबींचा तपास आम्ही करत आहोत, अशी माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

दोन दिवसांपासून प्रेयसीशी वाद, शेवटी घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या, चंद्रपूर हादरलं

शेजाऱ्यानेच केला 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाच्या कृत्यामुळे अहमदनगरमध्ये खळबळ

Car full of firecrackers was found outside MLA Prakash Surve’s office in Andheri