प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर…

| Updated on: Dec 04, 2022 | 6:03 PM

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

प्रसाद लाड म्हणाले, हे निव्वळ राजकारण, तरीही मी माफी मागतो, सगळ्याचा ठपका राष्ट्रवादीवर...
Follow us on

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, आमदार संजय गायकवाड आणि आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्याभरातून शिवप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. भाजपच्या विरोधकांनीही राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा इशारा दिला आहे.

तर प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की, मी जे वक्तव्य केले आहे.

त्यानंतर मी म्हटलं आहे की, कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यांनी या सगळ्या आंदोलनाचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण वादग्रस्त काही बोललो नाही.

त्यातून नको तो अर्थ काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे असा ठपका त्यांनी राष्ट्रवादीवर आणि त्यांच्या नेत्यावर ठेवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्याप्रमाणे राजकारण करत आहे त्याचा मी निषेध करतो असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ज्या भावनेतून आम्ही कार्यक्रम केला आहे, ‘स्वराज्य कोकण भूमी’ त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटले होते की, ती मी चूक सुधारली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणात आणि जन्म शिवनेरीवर झाला असं म्हटलं होतं असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यासोबत जे संजय यादव बसलेले होते, त्यांनी देखील ऐकले मी काय म्हटले आहे ते त्यांनी ऐकले आहे. तरीही छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ठेवला आहे.