NCP : राजकारणाचा जादूगार ‘राष्ट्रवादी’चं भाग्य बदलणार? प्रशांत किशोर दादांच्या पक्षाचे राजकीय चाणक्य? कोण ठरणार महाराष्ट्राचा धुरंधर?
Prashant Kishor Advisor of NCP: अजितदादांची राष्ट्रवादी सध्या अंतर्गत धुसफुसीमुळे चर्चेत आहेत. ज्येष्ठ नेते नाराज असल्याचा सूर बाहेर उमटत आहेत. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही गोटातील नेत्यांचा वर्षावरील राबता वाढला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या गोटातून आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

Prashant Kishor Advisor of NCP: अजितदादांच्या राष्ट्रवादीत काहीच आलबेल नसल्याचा दावा करण्यात येत आहे. काही ज्येष्ठ नेते नाराज असल्याचा सूर उमटला आहे. तर राष्ट्रवादीतील घाडमोडींवर तोडगा काढण्यासाठी वर्षांवर दोन्ही गोटातील नेत्यांचा राबता वाढल्याचेही म्हटले जात आहे. या अंदाजपंचमीत अजून एक बातमी येऊन धडकली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बिहार पॅटर्न चालणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. काय आहे ती मोठी राजकीय घडामोड?
प्रशांत किशोर दादांच्या राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार?
राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांच्या बळावर आम आदमी पक्षानेच नाही तर भाजपसह इतर पक्षांनी मोठी झेप घेतल्याचा दावा करण्यात येतो. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गळ्यातील तर ते ताईत होते. पण दोघांमध्ये फाटले आणि प्रशांत किशोर यांनी थेट त्यांचा जनसुराज्य पक्षच बिहारमधील विधानसभा निवडणुकीत उतरवला. तिथली हारकिरी सर्वांनी पाहिली. पण याचा अर्थ प्रशांत किशोर यांचं कसब संपलं असा होत नाही.
ते राजकीय धुरंधर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या खास निवडणुकीतील स्ट्रॅटर्जीने विजय खेचून आणला आहे. त्यांच्या खेळीने अनेक दिग्गज नेते भूसपाट झालेले आहेत. तर नवख्यांचे नशीब फळफळले आहेत. आता प्रशांत किशोर हे दादांच्या राष्ट्रवादीची राजकीय कमान संभाळण्यासाठी मोलाचा सल्ला देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार म्हणून ते काम पाहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीला येणार सुगीचे दिवस?
अजितदादांचं 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अकाली निधन झालं. त्यापूर्वी त्यांचे गुलाबी कॅम्पेन गाजले होते. त्यांनी भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षासोबतच अनेक निवडणुकीत चांगली मुसंडी मारली होती. पण दादा गेल्यानंतर पक्षातील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे नाराज असल्याची चर्चा आहे. तर खासदार पार्थ पवार, जय पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मनात काय सुरू आहे हे समोर आलेले नाही. पक्षातून सातत्याने गोंधळ उडवणाऱ्या खबरा, बातम्याच समोर येत असल्याने पक्षाची प्रतिमा डागळली जात आहे. त्याचवेळी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सल्लागार असतील असे वृत्त पक्षाला सुगीचे दिवस आणतील का? अशी चर्चा होत आहे.