AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षक-पदवीधर निवडणूक, सरकारमध्ये शिंदे गटाला खरंच डावललं जातंय? भाजपचा बडा नेता म्हणतो…..

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाला डावललं जात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अर्थात या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहेत. पण या चर्चांवर आता भाजपच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिलीय.

शिक्षक-पदवीधर निवडणूक, सरकारमध्ये शिंदे गटाला खरंच डावललं जातंय? भाजपचा बडा नेता म्हणतो.....
Image Credit source: tv9
| Updated on: Jan 11, 2023 | 4:58 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात सत्तांतर (Maharashtra Political Happenings) होऊन आता सहा महिने झाले आहे. सत्तांतराच्या सहा महिन्यांनंतरही मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अद्याप पार पडलेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती. प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे या धुसफूसीच्या बातम्या ताज्या असताना विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाला डावललं जात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अर्थात या चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहेत. पण या चर्चांवर आता भाजपचे महाराष्ट्रातील बडे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“मला वाटतं त्यांना मिळालं आहे. कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना देण्यात आलीय. ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिंदे गटाचे आहेत. त्यांना ते मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या वाट्याला शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आलेली आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

“आता इतर ठिकाणी आमचे उमेदवार सिटिंग असताना शिंदे गटाला उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. शिंदे गटाला उमेदवारी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही”, असं प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

“शिंदे गटाला अजिबात डावललं जात नाही. तशाप्रकारचा प्रयत्न कुणी करत असेल तर ते यशस्वी होणार नाही. शिंदे गट आणि भाजपमध्ये उत्तम संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात उत्तम समन्वय आहेत. त्यामुळे कुणीही डावलत नाही. तसा विषयच नाही. अत्यंत एकोपाने आणि एकदिलाने दोन्ही पक्षाचा कारभार सुरु आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

विधानपरिषदेच्या तीन शिक्षक मतदारसंघ आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झालीय. यामध्ये नाशिक, अमरावती या दोन पदवीधरच्या जागांसाठी आणि औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

भाजपकडून पाच जागांच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघासाठी तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कोकण शिक्षक मतदारसंघासाठी, रणजीत पाटील यांची औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी तसेच किरण पाटील यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीवर देखील प्रतिक्रिया दिलीय. “कायदेशीर बाजू तपासून यंत्रणा निर्णय घेतील. पण मुदत संपल्यावर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून राहू शकत नाहीत”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

“घटनेप्रमाणे कार्यकारिणी ठरवली जात असेल आणि पाच वर्षासाठी त्यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती होत असेल तर कार्यकाळ संपल्यावर ते पद संपुष्टात येतं. त्यामुळे शिंदे गटाचा दावा योग्य आहे की, ते आज पक्षप्रमुख म्हणून राहू शकत नाहीत”, असंदेखील दरेकर म्हणाले.

सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.