यूपीए सरकारचा काळ लकवा मारलेला, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, म्हणाले, २०१४ पासून…

| Updated on: May 29, 2023 | 4:35 PM

निर्णय न घेणं हा या सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता. निर्णय लकवा, अशाप्रकारची त्या सरकारची नीती होती. असा त्या सरकारचा उल्लेख केला जायचा.

यूपीए सरकारचा काळ लकवा मारलेला, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, म्हणाले, २०१४ पासून...
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडतोय, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. युपीए सरकारला लकवा मारलेला. २०१४ नंतर देशाचा वेगाने विकास झाला. मोदी सरकारच्या ९ वर्षपूर्तीच्या कार्यक्रमातून देवेंद्र फडणवीस यांनी यूपीए सरकारवर ताशेरे ओढले. फडणवीस म्हणाले, २००४ ते २०१४ या कालावधीमध्ये आपण यूपीएचं सरकार बघीतलं. निर्णय न घेणं हा या सरकारचा सर्वात मोठा निर्णय होता. निर्णय लकवा, अशाप्रकारची त्या सरकारची नीती होती. असा त्या सरकारचा उल्लेख केला जायचा.

नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून मागील नऊ वर्षात अतिशय गतिमान निर्णय प्रक्रिया आपण बघीतली. अतिशय जोमाचा विकास आपण बघीतला, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्षे झालीत. यानिमित्त मुंबई भाजपतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, विनोद तावडे आदी मंचावर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

यूपीएच्या काळात मोठे स्कॅम

९ वर्षे झाल्याबद्दल भाजपने महासंपर्क अभियान सुरू केलंय. या ९ वर्षांच्या उपलब्धी सांगण्यात आल्या. स्कॅम जेवढे यूपीएच्या काळात झाले तेवढे स्वतंत्र भारताच्या काळात कधीही झाले नव्हते.

मोदी यांचे सरकार आल्यानंतर मागील ९ वर्षांत अतिशय गतीमान निर्णय प्रक्रिया बघीतली. एकही डाग सरकारवर लावू शकलं नाही. भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था डिलिव्हरी सिस्टीम होती. ती करप्शन फ्री करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला. तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. गरीबांचे अधिकार त्यांच्यापर्यंत पोहचले.

७० कोटी डोजेस मोफत

देशात विविध योजना मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झाल्या. लाभार्थींचा वापर केला तर महाराष्ट्राचा विचार केला कोरोनाच्या काळात ७० कोटी डोजेस मोफत देण्याचे काम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले.

पीएम आवास योजना २५ लाख घरं बांधून तयार झाली. अनेक घरांचे काम सुरू आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ पोहचला. अशा मोदी सरकारच्या विविध उपलब्ध देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या.