पुष्पा स्टाईलनं संजय राऊत यांचा सरकारला इशारा, राऊत म्हणाले,…

राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे लोकं रस्त्यावर उतरले आहेत.

पुष्पा स्टाईलनं संजय राऊत यांचा सरकारला इशारा, राऊत म्हणाले,...
| Updated on: Nov 19, 2022 | 10:09 PM

मुंबई – झुकेगा नहीं असं सांगत संजय राऊत यांनी पुष्पा स्टाईलनं शिंदे-भाजप सरकारला इशारा दिला. पुन्हा तुरुंगात टाकलं तरी घाबरणार नाही, असं राऊत यांनी म्हटलंय. केळुस्कर यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातून संजय राऊत यांनी सरकारला इशारा दिलाय.

आमच्यासारख्यांची तोंड कुणाला बंद करता येणार नाही. लिहिणाऱ्यांची, बोलणाऱ्यांची सरकारला भीती वाटते, असंही राऊत यांनी सांगितलं. बाळासाहेबांबरोबर सलग ४० वर्षे काम केलेला माणूस आहे. मोडणार पण, वाकणार नाही, हा बाणा मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शानं चालतो. शिवाजी महाराज यांच्या आदर्श हे चिरंतन आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असंच वक्तव्य केलं. शिवाजी महाराज यांच्याकडून अशी वक्तव्य नेहमी केली जात आहेत.

वीर सावरकर यांच्याबद्दल सध्या जे काही वादळ उठलं. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे लोकं रस्त्यावर उतरले आहेत. आता राज्यापाल यांच्या शिवाजी महाराज यांच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरावे. मराठी बाणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलची निष्ठा दाखवायला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

आम्हाला काय करायचं ते लवकरच आम्ही करू. राज्यपालांना काय झालं हे समजत नाही. कधी महात्मा फुले, तर कधी सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आज शिवाजी महाराज यांचा अपमान केला, हे खपवून घेतलं जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.