Suraj Chavan-Dhananjay Powar : मला काय बोलता, सुरजला विचारा ना जाब ! डीपी दादा का भडकला ?
Dhananjay Powar On Suraj Chavan : डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तो प्रचंड भडकलेला दिसत आहे. सुरज चव्हाण याच्या घरी फर्निचर, सोफा देण्याच्या मुद्यावरून तो बोलत असून काय काय घडलं ते त्याने स्पष्टच सांगितलं आहे.

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन खूप गाजला होता. त्या पर्वाचा विजेता ठरलेला, प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण (Suraj Chavan) हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सुरजचं लग्न झालं, त्या आधीच त्याच्या नव्या घराचा गृहप्रेवशही पार पडला. सुरजे त्याच्या आयुष्याचे बरेच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याचं नवं घरं, फर्निचर, इंटिरिअर पाहून सगळे अवाक झाले. तर त्याच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओही अनेकांना आवडले. बिग बॉसच्या घरात सुरजसोबत असलेले इतर काही कलाकार, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवरा हे लग्नाला हजर होते.
सुरज चव्हाण याचं आधीच घर खूपच लहान होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांला मोठं, ऐसपैसे, राजवाड्यासारखं आलिशान घरं बांधून दिलं, त्यानंतर गृहप्रवेशाच्या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले, लोकांनी कमेंट्स करत कौतुकही केलं. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये घरात अतानाच डीपा दादा अर्थात धनंजय पोवार याने सुरजला सांगितलं होतं की तुझ्या नव्या घरात सोफासेट मीच देणार. मात्र सुरजच्या नव्या घराचा व्हिडीओ,फर्निचर वगैरे समोर आल्यावर त्याला सोफासेट दुसऱ्याच कोणीच दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मात्र डीपी दादाला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. याने फक्त मतांसाठी सुरजला (बिगबॉसच्या) घरात सोपासेटचं आश्वासन दिलं असं म्हमत डीपी दादावर अनेक आरोप करण्यात आले.
मात्र यानंतर आता डीपी दादाने स्वत: पुढे येऊन या संपूर्ण विषयावर भाष्य केलं आहे. नेमकं काय घडलं हेच त्याने थेट सांगितलं आहे.
डीपी दादाने शेअर केली पोस्ट
8 मिनिटांचा हा लांबलचक व्हिडीओ डीपीदाादाने शेअर केला असून त्यात तो चांगलाच भडकलेला दिसला आहे. या व्हिडीओसोबतच त्याने एक कॅप्शनही लिहीली आहे. ” त्याला बाहेरून सोफा मिळाला त्याने घेतला , पण त्याने मला ही कॉल केला होता कस करूया म्हणून .. पण त्याने बाहेर जर सांगितले होते तर ते त्याने मला कळवलं पाहिजे होते तरी ही त्याने मला लोकेशन टाकायला पण वेळ केला (आदल्या रात्री पाठवले ) जणू आधी मी त्याला हे पण बोललो की लग्नाची गडबड आहे तेव्हा २/३ दिवस जौदे आपण नंतर पाठवू त्यावर पण तो हा बोलला होता. मी ३/४ वेळेस कॉल केले त्याला अड्रेस पाठव , सोफा बघायला येतोस का किंवा माप सांग काय आहे हॉलचे , किंवा हॉलचे फोटोज पाठव वगेरे वगेरे .. आता मी याच्या पेक्षा जास्त काय बोलू ? कदाचित आज त्याला कोणीतरी जास्त देते म्हणून मला विसरला का ? ” असा मेसेज या व्हिडीओसबत लिहीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हिडीओमध्ये काय म्हणाला धनंजय पोवार ?
‘आजचा विषय, सूरजच्या फर्निचरचा आहे. सूरजला मी सांगितलेलं की, तुझ्या घरात सोफासेट असेल तो मी देणार. सोसायटी फर्निचर देणार. दीड महिन्याअगोदर त्याचा मला फोन आलेला, सोफासेटचं काय करणार? मी त्याला म्हटलं, मी सोफासेट पाठवतोय. तू इकडे येणार आहेस का? तुला कोणता हवा आहे? त्यानंतर मी त्याच्याकडे पत्ता मागितला. त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत त्याने मला सांगितलं नव्हतं की, मी बाहेरून फर्निचर घेतलंय. मला काहीच माहित नाही. मी पुण्याच्या पार्टीला सांगून सोफा तयार करून घेतलेला. पण आज लोकं कमेंट करतायत मतासाठी ह्यांनी असं केलं.’ असं म्हणत डीपी दादाने खंत व्यक्त केली.
सूरजला जाब विचारा ना!
‘आज आम्ही जे काही आहोत, ते स्वतःच्या हिंमतीवर आहोत. त्याला म्हटलं मी देणार होतो तुला. तो म्हणाला, ‘मला दादा देणार आहेत’ आणि ह्याचा जाब सूरजला विचारा ना!” असंही त्यांनी नमूद केलं. ” मी आजही सोफासेट त्याला द्यायला तयार आहे. माझं त्याच्या भावासोबतही बोलणं झालेलं. कमेंट करताना विचार करायचा. त्याला जर माझ्याकडून नको असेल, त्याला मी काय करू? त्याने पण आम्हाला किंमत द्यायला पाहिजे. त्याने स्वतःहून सांगायला पाहिजे. मला का विचारताय तुम्ही? त्याने मला सांगितलं नाही. त्याने लग्नाच्या दिवसापर्यंत मला लोकेशन, पत्ता काहीच पाठवलं नाही. आणि आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला कशाला कमेंट करायच्या आहेत?’ असा थेट सवाल विचारत धनंजय पोवारने ट्रोलर्सना, टीकाकारांनाच झापलं.
