Suraj Chavan : जी होती मनात.. लग्नानंतर सुरज चव्हाण याची बायकोसाठी पहिली पोस्ट ! लव्ह की अरेंज मॅरेज,थेट सांगितलं..
बिग बॉस मराठी विजेता सुरज चव्हाण नुकताच लग्न बंधनात अडकला. 29 नोव्हेंबर रोजी त्याने संजना गोफणे हिच्याशी विवाह केला. त्यांचं लव्ह मॅरेज आहे. सुरजने लग्नानंतर पत्नीसाठी खास पोस्ट लिहीत हे शेअर केलं. त्यावर लाखो लाईक्स, कमेंट्स आल्या आहेत.

महाराष्ट्राचा लाडकी रीलस्टार, झापूक झुपूक डॉयलॉगने फेमस झालेला सुरज चव्हाण (Suraj Chavan) याने शनिवारी नव्या आयुष्याची सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी सुरजच्या व्या घराचा गृहप्रवेश पार पडला.त्यानंतर थोरामोठ्यांच्या आशीर्वादात 29 नोव्हेंबर रोजी सुरज आणि संजना दोघेही, लग्नबंधनात अडकले. त्यांचं प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी,हळद, वरात, लग्नाचे विधी या सर्व सोहळ्यचे प्रत्येक अपडेट्स फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येत होते. बिग बॉस मराठीच्या घरातले सहकारी जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार या दोघांनाही लग्नाला हजेरी लावत सुरज – संजनाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
तर आता लग्नानंतरच्या एकेक विधींचे फोटोही सुरजने शेअर केले असून नवदांपत्य नुकतंच जेजुरीला जाऊन मार्तंड मल्हारीचा आशीर्वाद घेऊन आले. खंडेरायाच्या आशिर्वादाने दोघांनी नव्या आयुष्याची सुरूवात केली असून आता सुरज चव्हाणने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहीली आहे. एवढंच नव्हे तर आपलं लव्ह मॅरेज आहे की अरेंजे मॅरेज हेही त्याने या पोस्टमधून थेट सांगितलं आहे.
संजनासाठी सुरजची खास पोस्ट
प्री-वेडिंग फोटो शूटमधले काही फोटो पोस्ट करत सुरज याने त्याची पत्नी संजनासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शानदार शेरवानी घालून रुबाबदार दिसणारा सुरज आणि गुलाबी रंगाच्या घागऱ्यामध्ये सौंदर्यवती दिसणारी संजना यांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर छान हास्य विसत आहे. त्यासोबत सुरजने एक मस्त कॅप्शनही लिहीली आहे. ‘जी होती मनात तीच बायको केली, Love Marriage Successfull ‘ असं सुरजने लिहीलं आहे. त्यासोबतच आपलं अरेंज नव्हे तर लव्ह मॅरेज आहे, हेही त्याने या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
View this post on Instagram
त्याच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आले असून सुरजचे चाहते, शुभेच्छुक यांनी दोघांच्या फोटोंवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. ‘महाराष्ट्राची फेवरेट जोडी ठरणार सुरज आणि संजना या जोडीला कोणाची नजर लागायला नको’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. ‘असेच खुश राहा दोघेपण…😍 आयुष्य भर सोबत राहा ❤️ सुखादुःखात जसे आजपर्यंत साथ देत आलेत एकमेकांना तसेच आयुष्यभर देत राहा…❤️ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आणि संसारासाठी खुप खुप शुभेच्छा.’ असं लिहीत दुसऱ्या चाहत्याने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
