Suraj Chavan : सुरज चव्हाण याच्या लग्नाला गैरहजर, पण खास पोस्टमधून कोकण हार्टेड गर्लने जिंकलं मन
कोकण हार्टेड गर्ल ही सुरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होती, मात्र सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट लिहून तिने सुरज-संजनाला शुभेच्छा देत त्यांना एक खास संदेशही दिला आहे. तिची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रसिद्ध रीलस्टार, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता , झापूक झुपूक डॉयलागने घराघरांत पोहोचलेला सुरज चव्हाण (Suraj Chavan) याचा शनिवारी थाटामाटात विवाह पार पडला. सासवड जवळच्या एका हॉलमध्ये सुरज आणि संजना 29 नोव्हेंबरला संध्याकाळी लग्नबंधनात अडकले. या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्च होती. सुरजच्या लग्नाच्या आधीचे विधि, घाणा बरणे, मेहँदी, हळ, लग्नाची वरात या सर्वांचे फोटो, व्हिडीओ सटासट व्हायरल झाले. या लग्नासाठी सुरजने उपमुख्यमंत्रीअजित चव्हाण, सुप्रिया सुळे, अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख यांच्यासह बिग बॉस मराठी सीझन 5 त्या सर्व टीम मेंबरना निमंत्रण दिलं होतं.
मात्र 1-2 चेहरे सोडले तर फारसे कोणी सेलिब्रिटी हे सुरजच्या लग्नाला आले नव्हते. जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार मात्र आवर्जून लग्नाला आले, वरातीत नाचले आणि धमालही केली. मात्र इतर सेलिब्रिटी या लग्नाकडे फिरकले नाहीत. त्यातच बिग बॉसच्या घरात गाजलेली आणि संजना सुरजचं केळवण करत जिने पहिल्यांदाच सुरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा सर्वांना दआखवला ती कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभु वालावलकर ही देखील लग्नाला आली नव्हती.
अंकिताची सुरज-संजनासाठी खास पोस्ट
काही दिवसांपूर्वी अंकिताने सुरज-संजनाचं तिच्या घरी केळवण केलं. त्यांच्यासाठी खास सजावट केली, गोडाधोडाचा बेतही होता. या केळवणाच्या फोटो, व्हिडीओमधूनच सर्वांना सुरजच्या होणाऱ्या पत्नीचं नाव समजलं, सर्वांना तिचा चेहराही दिसला. त्यानंतर अंकिताने दोघांना लग्नाच्या शॉपिंगसाठीही मदत केली होती. मात्र तीच अंकिता या दोघांचा लग्नाला हजर नव्हती, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या . पण तिने आधीच स्पष्ट केलं होतं की सुरूज-संजनाचं लग्न आहे, त्याच दिवशी (29 नोव्हेंबर) तिला दुसऱ्या ठिकाणी लग्नासाठी जायचं होतं, म्हणूनच ती हजर राहू शकणार नाही हे तिने सांगितलं होतं.
दरम्यान असं असलं तरी आता अंकिताने नवविवाहीत जोडपं सुरज आणि संजना या दोघांसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Suraj Chavan : सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण ? अखेर चेहरा दिसलाच.. अंकिताने थाटात केलं केळवण
नांदा सौख्य भरे… अंकिताने काय लिहीलं ?
अंकिताने दोघांसाठी खास पोस्ट लिहीली. ” प्रिय सूरज आणि संजना, आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात. या वाटेवर कधी उजेड असेल, कधी अंधार, कधी सावल्या, पण एकमेकांचा आधार, माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते. जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर, आपुलकी आणि जिव्हाळा कायम ठेवा. छोट्या छोट्या क्षणांत आनंद शोधा, एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यांतील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. नांदा सौख्य भरे… तुमच्या नवविवाहित जीवनाला मन:पूर्वक, हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा” असं लिहीतं अंकिताने तिच्यातर्फे व तिचा पती कुणालतर्फे सुरज-संजनाला खास शुभेच्छा दिल्या. तिची ही पोस्ट खूप चर्चेत असून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

