IndiGo Airlines Row: …ते आमचं काम नाही, सुप्रीम कोर्टानं ‘इंडिगो’ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने इंडिगो एअरलाईन्स प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एअरलाईन चालवणे हे न्यायालयाचे काम नाही असे स्पष्ट करत, सरकारने हे प्रकरण सांभाळावे आणि केंद्राने इंडिगोवर कारवाई करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत
इंडिगो एअरलाईन्सचे प्रकरण सरकारने सांभाळावे, असे कठोर निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एअरलाईन चालवणे हे न्यायालयाचे काम नाही, असे स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. इंडिगो एअरलाईन्सवर केंद्र सरकारने कारवाई करावी, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या महत्त्वाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू असून, न्यायालयाच्या या भूमिकेमुळे केंद्र सरकारवर या प्रकरणी तत्काळ पावले उचलण्याचे बंधन आले आहे. तर इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे देशभरात प्रवाशांना मोठा फटका बसला. या मनस्तापामुळे गंभीर परिस्थितीवर तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी याचिका नरेंद्र मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी सरकारकडे या अडचणीच्या परिस्थितीत कोणते पर्याय आहेत, अशी विचारणा केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं

