Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा-विराट कोहलीला वेगळ्या पद्धतीने वागवा, माजी खेळाडूचा बीसीसीआयला कठोर संदेश
Rohit Sharma-Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बाबतीत टीम इंडियाच्या माजी फलंदाजी प्रशिक्षकाने कठोर संदेश दिला आहे. हे दोन ग्रेट खेळाडू पुढची दोन वर्ष असाच फॉर्म आणि फिटनेट टिकवणार का? हा मुख्य प्रश्न आहे.

“मागच्या अनेक वर्षात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांच्याबाबतीत विशेष विचारा करावा. वनडे संघातील त्यांच्या स्थानाबद्दल प्रश्न चिन्हच निर्माण नाही झालं पाहिजे” असं टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी म्हटलं आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सिनियर खेळाडूंच्या निवडीसाठी बोर्डाकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचा निकष लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय बांगर यांनी हे मत व्यक्त केलं. भारताच्या वनडे वर्ल्ड कप संघात रोहित शर्मा, विराट कोहलीचा समावेश करण्यासंबंधी अजित आगरकर यांची निवड समिती आणि हेड कोच गौतम गंभीर यांनी कुठलीही कटिबद्धता दाखवलेली नाही.
हे दोन ग्रेट खेळाडू पुढची दोन वर्ष असाच फॉर्म आणि फिटनेट टिकवणार का? हा मुख्य प्रश्न आहे. आता दोघेही इंटरनॅशनल क्रिकेटच्या फक्त एकाच फॉर्मेटमध्ये खेळतायत. कारण टी 20 आणि टेस्टमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केलीय. त्यांच्या नावाचा विचार व्हावा असं वाटत असेल, तर त्यांनी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावं असा निवड समितीचा आग्रह आहे. विजय हजारे ट्रॉफी भारतातील ए ग्रेडची टुर्नामेंट आहे. या महिन्याच्या अखेरीस ही टुर्नामेंट आहे.
मागच्या सहा सामन्यात रोकोच प्रदर्शन कसं?
मागच्या सहा वनडे सामन्यांपैकी चार सामन्यात भारतीय संघाने जे यश मिळवलं, त्यामध्ये रोहित-विराटची भूमिका महत्वाची होती. तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा यामध्ये समावेश आहे. दोन विराट कोहलीने सेंच्युरी मारल्या. पाचपैकी तीन हाफ सेंच्युरी रोहितच्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्मा मालिकावीर पुरस्कार मिळवला. विराट कोहलीने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये हाच पुरस्कार मिळवला.
मागची अनेक वर्ष त्यांनी काय केलय ते पाहा
“रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघातील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं असं मला वाटत नाही. मागची अनेक वर्ष त्यांनी काय केलय ते पाहा” असं संजय बांगर जिओ स्टारशी बोलताना म्हणाले. “दोघेही दोन फॉर्मेटमधून रिटायर झाले आहेत. त्यामुळे लय मिळवण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल. पण तरुण खेळाडूंसारखे त्यांना जास्तीत जास्त सामने खेळायची गरज नाही. एकदा का त्यांची धावांची भूक वाढली, ते फिट झाले की तुम्हाला अशा क्वालिटीचे प्लेयर्स लागतील. त्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागवलं पाहिजे. त्यांना त्यांची मोकळीक दिली पाहिजे” असं संजय बांगर म्हणाले.
