AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुन्हे मागे घेणार? कुणबी प्रमाणपत्रांचा विषय मार्गी लागणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाअगोदर विखे पाटलांचे मोठे संकेत काय?

Radhakrushana Vikhe Patil on Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. आज ते अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट घेणार आहेत. यावेळी अनेक मुद्यांवर या भेटीत चर्चा होईल.

गुन्हे मागे घेणार? कुणबी प्रमाणपत्रांचा विषय मार्गी लागणार? मनोज जरांगे यांच्या उपोषणाअगोदर विखे पाटलांचे मोठे संकेत काय?
राधाकृष्ण विखे पाटील, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 29, 2026 | 9:52 AM
Share

Radhakrushana Vikhe Patil on Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर सरकार दरबारी हालचाली वाढल्या आहेत. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे संकेत दिले. त्यांनी जरांगे पाटील यांची दुपारी भेट घेणार असल्याचे सांगितले. सरकार त्यांच्या मागण्यांविषयी अनुकूल असल्याचे मोठे संकेतही त्यांनी दिले.

जरांगे पाटील उपोषण करणार नाही, हा विश्वास

गुन्हे मागे घेण्याविषयी असो अथवा या आंदोलनता ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याबाबत सरकराने कार्यवाही केलेली आहे. पण मनोज जरांगे पाटील यांनी त्यात काही उणीवा असल्याचे म्हटले आहे. आज त्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा करू. या उणीवा कशा दूर केल्या. त्यांचे काही गैरसमज असतील ते दूर करू. सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ते उपोषण करणार नाही असा माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

आज दुपारी अंतरवाली सराटीत जाणार आहे. राज्य सरकारने काहीच केला नाही असे बोलणं चुकीचे आहे. ५८ लाख कुणबी नोंद निघाल्या आहे. अडीच लाख पेक्षा जास्त कुणबी दाखले आपण दिले आहेत. मी आज त्यांची भेट घातल्यानंतर त्यांना टोकाचा पाऊल उचलण्यासाठी थांबण्याचा प्रयत्न करेल. आमची अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार नाही. आरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली होती, असे विखे पाटील म्हणाले.

आता 61 गुन्ह्यांचा प्रश्न

एकूण 961 पैकी आता केवळ 61 गुन्ह्यांचा प्रश्न उरला आहे. इतर गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. हे 61 गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यात काहींनी घर जाळल्याचा आरोप आहे. तर अशा गुन्ह्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. पण जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या सरकारने अगोदरच पूर्ण केल्या आहेत. हैदराबाद गॅझेट अथवा सातारा गॅझेट अंमलबाजवणीत काही कायदेशीर आणि प्रक्रियेतील अडचणींविषयी त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना अवगत करण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. आज दुपारी विखे पाटील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत आणि सरकारची भूमिका आणि बाजू स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?