लाडकी बहीण अन् लाडका भाऊ…; राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला

Raj Thackeray on Ajit Pawar Supriya Sule : लाडकी बहीण अन् लाडका भाऊ... मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. मुंबईत होत असलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

लाडकी बहीण अन् लाडका भाऊ...; राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला
सुप्रिया सुळे, अजित पवार, राज ठाकरे
Image Credit source: Facebook
| Updated on: Jul 25, 2024 | 1:15 PM

मुंबईतील वांद्रे भागातील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला आहे. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ…. अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी…., असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

रंगशारदा सभागृहात होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मराठी उद्योजकांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. मी म्हटलं म्हणजे काय. मला म्हटलं तुमची भाषणं ऐकून प्रेरणा घेऊन इथे आलो आणि रेस्टॉरंट सुरू केली. मी म्हटलं अरे मराठी मुला मुलींनी व्यवसाय सुरू करा म्हटलं होतं. देश सोडा म्हटलं नव्हतं. तरीही ही मुलं परदेशात अस्तित्व निर्माण करतात. मी तिथे गेलो आणि थक्क झालो. त्या रेस्टॉरंटची आतली सिटिंग कॅपेसिटी १०० लोकांची आणि बाहेर ५० लोकांची. दीड ते दोन तासांचं वेटिंग होतं. त्यात ४० टक्के परदेशी लोकं होती. बरं वाटतं ही लोकं पाहून. आपला व्यवसाय सुरू करतात. काम करतात. असंख्य मराठी लोकांनी उद्योग सुरू केलेत. तिथे मराठी माणसं भेटली, असं राज ठाकरे म्हणाले.

मी तिथे म्हटलं. कदाचित ऐकलं असेल. मी म्हटलं पाण्यापासून टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही. करून पाहा एकदा. ज्याची जळते त्याला कळते ही म्हण तिथूनच आलं असेल. परदेशातील प्रवास खूप त्रासदायक असतो. तिथे आपली हालत होते. प्रवास करून मी हॉटेलमध्ये आलो. रुममध्ये शिरलो. मी बाथरुममध्ये शिरल्यावर माझ्या ढुं#X@ने हंबरडा फोडला, असं राज ठाकरे म्हणाले.

राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्या- राज ठाकरे

राज्यातील प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच विधानसभेतील तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका करायच्या. हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.