Rajesh Tope on School : अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा भडका, मुख्यमंत्री टास्क फोर्स शाळांबाबत निर्णय घेणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

| Updated on: Dec 29, 2021 | 1:22 PM

अहमदनगरला जे झालंय ते केस स्टडी म्हणून विचार केला जाईल. याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.

Rajesh Tope on School : अहमदनगरच्या शाळेत कोरोनाचा भडका, मुख्यमंत्री टास्क फोर्स शाळांबाबत निर्णय घेणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us on

मुंबई: महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, निर्बंध आणि 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं लसीकरण यासह शाळा सुरु ठेवण्याबाबत भाष्य केलं. केंद्र सरकारच्या 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीनं सज्ज आहोत. भारत सरकारनं लहान मुलांना कोवॅक्सिन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणं कोवॅक्सिन देण्यात येणार आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का याची चाचपणी सुरु असल्याचं राजेश टोपे म्हणाले. राज्यातील शाळांमध्ये काही ठिकाणी विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याचं कळलंय. अहमदनगरला जे झालंय ते केस स्टडी म्हणून विचार केला जाईल. पॉझिटिव्ह झाले तरी मुलांचा आजार बळावत नाही, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सबरोबर चर्चा करून दोन दिवसात शाळांबाबत निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.

कोरोना नियम पाळणार नसू तर निर्बंध वाढणार

मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेट नक्कीच चागंला नाही. 4 टक्के पॉझिटीव्हीटी रेट असेल तर काळजी करण्याची गरज आहे. दिल्लीत सर्व प्रतिबंधित करण्यात आलं आहे. लग्न आणि इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. आपण जर निष्काळजीपणा केला तर आपल्याला धोका होऊ शकतो.

कोरोना नियम पाळणार नसू तर निर्बंध वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ निर्णय घेईल. वाढत असलेली रुग्णसंख्या, ओमिक्रॉनची रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची तातडीनं बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 167 वर पोहोचलीय, त्यापैकी जमेची बाजू 91 जण बरे झाले आहेत ही आहे.

लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्नांची गरज

महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही. त्यामुळं आमदार, सर्वपक्षीय नेते, संघटना यांनी पुढाकार घेऊन लसीकरण न करण्याची मानसिकता असणाऱ्याचं प्रबोध करण्याची गरज आहे. देशाच्या लसीकरणाच्या दरापेक्षा महाराष्ट्राचं लसीकरणाचं प्रमाण थोडं कमी आहे. महाराष्ट्रात 13 कोटी लोकांचा लसीकरण झालंय. ही चांगली बाब आहे. मात्र, 8 कोटी लोकांनी पहिला डोस घेतलाय. 9 कोटीचं टार्गेट आहे. मात्र, दुसऱ्या डोसचं लसीकरण 57 टक्के झालंय. दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 5.5 कोटी आहे.

निर्बंध पाळण्यासाठी पोलीस आणि प्रशासानाचा वापर करावा लागेल

हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करुन त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरनं माहिती दिलेली नाही. बुस्टर डोसचं लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्यानं तोपर्यंत आम्ही वाट पाहू, असं राजेश टोपे म्हणाले.

आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार निर्बंध वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. लग्न आणि इतर कार्यक्रमात निर्बंध पाळले जात नाहीत. पोलीस आणि प्रशासनाचा वापर करावा लागेल.

इतर बातम्या:

महाराष्ट्रात आणखी कडक निर्बंध येणार? आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; केंद्राची टीम राज्याच्या दौऱ्यावर

आधारकार्ड नसल्यास शाळा कॉलेजच्या आयकार्डवर लस मिळणार, विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी मेगाप्लॅन

Rajesh Tope said Uddhav Thackeray and Task force will take decision about school on the present corona cases hike