नरेंद्र मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कविता; म्हणाले, मविआ आहे घमंडी…

Ramdas Athwale on Loksabha Election 2024 in PM Narendra Modi Kalyan Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये सभा होत आहे. रामदास आठवले यांनी या सभेत कविता सादर केली.

नरेंद्र मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कविता; म्हणाले, मविआ आहे घमंडी...
| Updated on: May 15, 2024 | 5:53 PM

महायुतीच्या उमेदवारांसाठी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये आज सभा होत आहे. कल्याण पश्चिमेमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही जाहीर सभा होत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील संबोधित केलं. यावेळी रामदास आठवलेंनी कविता सादर केली. इस लोकसभा चुनाव मै हम नही माने के हार, इस बार करेंगे 400 पार… इंडी आघाडी की होने वाली है हार, फिर क्यु नहीं करेंगे 400 पार… मविआ आहे घमंडी, कपिल पाटील जिंकणार भिवंडी, असं म्हणत आठवले यांनी भाषणाला सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदेनी तलवार केलीय म्यान, श्रीकांत शिंदे निवडणुन आणणार आहे कल्याण… कपिल पाटील अत्यंत एँक्टिव्ह असणार मंत्री आहेत. दोघांना निवडून देण्याचं आवाहन करण्यासाठी मी आलोय, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. मोदी विरोधात बोलण्याचा अधिकार आहे. मात्र उद्धव ठाकरे भाजप सोबत जाणार होते. मात्र गेले नाही तीदेखील गद्दार नाही का? तुम्ही गद्दारी केली म्हणून तुमचा धनुष्यबाण गेला…, असं रामदास आठवले म्हणाले

जाहीर सभेत प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातला म्हणून विरोधकांनी प्रफुल्ल पटेल यांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरही आठवलेंनी भाष्य केलं आहे. प्रफुल पटेल यांनी भावनेने नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातली. भावनेने फेटा घातला. त्यांच्यावर विरोधक टीका करत आहेत. अरे पण नाटकातही शिवरायांचा जीरेटोप घातला जातो, असं आठवले म्हणाले.

कल्याणमधील सभेला स्थानिकांची गर्दी

कल्याणमधल्या नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी ठिकठिकाणहून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते कल्याणमध्ये आले आहेत. श्रमजीवी, ग्रामीण आदिवासी भागातील खेड्यापाड्यातील नागरिक स्त्री- पुरुष हे सुद्धा मोठ्या संख्येने सभेसाठी दाखल झाले आहेत. कल्याण लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या सभेत राम मंदिराच्या प्रतिकृती आणि सोबत सेल्फी पॉईंटची क्रेज पाहायला मिळतेय. नरेंद्र मोदींसोबत फोटो सोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्ता पदाधिकारी आणि समर्थकांची गर्दी झाली आहे.