आरबीआयची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर मोठी कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांचं पालन न केल्याबद्दल महाराष्ट्रातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

आरबीआयची महाराष्ट्रातील या बँकेवर मोठी कारवाई
ऑफिसर ग्रेड-बीच्या पहिल्या पेपरचा निकाल जाहीर
| Updated on: Oct 29, 2019 | 9:14 PM

मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) वेळोवेळी जारी केलेल्या दिशानिर्देशांचं पालन न केल्याबद्दल महाराष्ट्रातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या प्रकरणी जनता सहकारी बँकेला (पुणे) तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड (RBI imposed penalty on Janata Sahakari Bank) ठोठावला आहे. आरबीआयच्या अलिकडील मोठ्या कारवायांपैकी ही कारवाई मानली जात आहे. जनता बँकेच्या खातेधारकांमध्ये देखील या कारवाईने चिंतेचे वातावरण आहे.

उत्पन्नाच्या स्रोतांची आणि संपत्तीची माहिती देण्याबाबत आरबीआयच्या निर्देशांचं जनता सहकारी बँकेने पालन केलं न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने जळगावच्या पीपल्स को-ऑपरेटिव बँकेलाही 25 लाख रुपयांचा दंड केला आहे. याआधी आरबीआयने तामिळनाडूमधील मर्केंटाईल बँकेवर कारवाई करत 35 लाख रुपयांचा दंड केला होता. फसवणूक प्रकरणांची नियमांनुसार योग्य माहिती न देण्याबाबत ही कारवाई झाली.


नुकतीच आरबीआयने पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेवर कारवाई केली. त्यानंतर या बँकेतील खातेधारकांवर पैसे काढण्यासाठी अनेक निर्बंध आले. यात अनेक खातेधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही खातेधारकांना वेळेवर उपचारासाठी पैसे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या. ते प्रकरण अजून ताजं असतानाच आरबीआयने ही कारवाई केली आहे. त्यामुळे आरबीआयने भविष्यात जनता बँकेवर देखील अशीच काहीशी कारवाई करणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.