उपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची ‘एमपीएससी’ मार्फत भरती

| Updated on: Sep 22, 2021 | 11:15 PM

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते.

उपमुख्यमंत्री अजितदादांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला; साडे पंधरा हजाराहून अधिक पदांची एमपीएससी मार्फत भरती
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत राज्य शासनातील साडे पंधरा हजार पदांची भरती करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला होता. त्यासाठी ‘एमपीएससी’ आणि सामान्य प्रशासन विभागाच्या सातत्याने बैठका घेत, या भरती प्रक्रियेतील त्रुटी आणि अडचणी दूर करत त्याचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलने केला. त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळाली. (Recruitment of more than fifteen and a half thousand posts through MPSC)

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते. गट ‘अ’, गट ‘ब’ व गट ‘क’ श्रेणीतील कार्यकारी पदे भरतीप्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देण्यात आली. ‘एमपीएससी’मार्फत भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील वर्ष 2018 पासूनच्या एकूण 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता मिळाली. सर्वच विभागांना त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले.

भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढलेय

राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी रिक्त पदांची माहिती संकलित करण्याचे निर्देशसंबंधित विभागाला दिले होते. त्यासाठी मंत्रालयात सातत्याने बैठका घेतल्या होत्या. राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया गतिमान करण्यासाठी, एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा भरण्यात आल्या. त्याचाही विशेष पाठपुरावा अजितदादांनी केला होता. 2018 पासून एमपीएससीद्वारे भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गातील गट ‘अ’च्या 4 हजार 417, गट ‘ब’ च्या 8 हजार 31 आणि गट ‘क’ च्या 3 हजार 63 अशा तीन संवर्गातील एकूण 15 हजार 511 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये वेळेनुसार वाढच होणार आहे.

अजितदादा स्टाईल आणि पाठपुराव्यामुळेच ‘एमपीएससी’ भरतीची प्रक्रिया गतिमान

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या पदभरतीमधील अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून 4 मे 2021 आणि 24 जून 2021 च्या शासन निर्णयांतून सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली होती. या विशेष सूट देण्याच्या निर्णयामुळे ‘एमपीएससी’च्या पदभरती प्रक्रियेला गती मिळाली. मात्र ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. अजितदादा स्टाईल आणि पाठपुराव्यामुळेच ‘एमपीएससी’ भरतीची प्रक्रिया गतिमान झाली. (Recruitment of more than fifteen and a half thousand posts through MPSC)

इतर बातम्या

ओळखपत्र दाखवा आणि लस घ्या; मुंबई महापालिकेची विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिम

सांगली मिरजेत पुनर्विवाहाचा अनोखा विवाह सोहळा, 66 वर्षांची आणि 79 वर्षांच्या आजीने बांधली लगीनगाठ