AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 लाख कोटींचा घोटाळा… तो फोटो… मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका सवालाने मोठी खळबळ

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: देशात अजून एक मोठा घोटाळा समोर आला आहे. राजेश मेहताच्या कंपनीतील घोटाळ्याने काहूर उठले आहे. तर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक फोटो पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक रोकडा सवालही केला आहे.

15 लाख कोटींचा घोटाळा... तो फोटो... मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? रोहित पवारांच्या एका सवालाने मोठी खळबळ
रोहित पवार यांचा भाजपवर निशाणाImage Credit source: रोहित पवार यांच्या ट्विटर खात्यावरून
| Updated on: Jun 05, 2026 | 10:58 AM
Share

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: 15 लाख कोटींच्या घोटाळ्याने देश पुन्हा हादरला आहे. राजेश मेहता यांच्यावर या घोटाळ्याचा आरोप आहे. तर या घोटाळ्यावरून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे आणि एलआयसीने मेहताच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी असा रोकडा सवाल विचारला आहे. त्यांच्या या निशाण्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण?

LIC ने मेहताच्या कंपनीत गुंतवणूक केलीच कशी?

“15 लाख कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजेश मेहताचा घोटाळा जगातील सर्वात मोठा Accounting घोटाळा असणार आहे. मेहताच्या कंपनीत इतर म्यूचुअल फंड कंपन्या गुंतवणूक करण्यास टाळाटाळ करत असताना LIC ने गुंतवणूक केलीच कशी ? मेहता प्रकरण अतिशय गंभीर असून SEBI सारख्या संस्था कशी माती खातात हे सिद्ध झाले आहे. यात सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे LIC चा गुंतलेला पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे, त्यामुळे जनतेच्या पैशाची देखील माती झाली आहे.” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

नेमकं प्रकरण तरी काय?

शेअर बाजार नियामक संस्था SEBI ने बंगळुरू येथील ज्वेलरी कंपनी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड आणि तिचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश मेहता यांच्याविरोधात अंतरिम आदेश दिला आहे. कंपनीने चुकीची आर्थिक माहिती दिली. प्रमोटर्सच्या माध्यमातून फंडचा चुकीचा वापर केला. तर इतर अनेक गंभीर आरोप कंपनीसह मेहतांवर लावण्यात आले आहे. सेबीच्या माहितीनुसार राजेश एक्सपोर्टसने कथितरित्या आर्थिक वर्ष 2021 आणि आर्थिक वर्ष 2025 या दरम्यान जवळपास 15.15 लाख कोटी रुपयांच्या एकूण महसूलाविषयी चुकीची माहिती दिल्याचा ठपका सेबीने लावला आहे. राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडने 99.8 टक्के महसूल वाढवून दाखवल्याचे, भासवल्याचे सेबीचे म्हणणे आहे.

कोण आहे राजेश मेहता?

राजेश मेहता यांचा जन्म बेंगळुरूमध्ये 20 जून, 1964 रोजी झाला. ते राजेश एक्सपोर्ट्स कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी सोने आणि सोन्याचे दागिने या गोल्ड इंडस्ट्रीतील नावाजलेली कंपनी आहे. राजेश मेहता यांनी बेंगळुरू येथील सेंट जोसेफ या शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अगदी कमी वयात त्यांनी वडीलांच्या सराफा व्यवसायात लक्ष घातले. 1980 च्या दशकात राजेश मेहता यांनी भाऊ प्रशांत याच्या सोबत चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी त्यांनी मोठ्या भावाकडून 1,200 रुपये उधार घेतले होते. त्यावेळी सराफा व्यवसाय इतका संघटित नव्हता.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?