वडिलांनी सांभाळलं नाही, तरीही गौतमी पाटील यशाचं श्रेय वडिलांना का देते?; काय आहे कारण?

मी कधीच लावणीचे कार्यक्रम केले नाही. घागरा आणि वेस्टर्न ड्रेसमध्येच कार्यक्रम केले. लोकगीतं असतात त्यावेळी लावणीची साडी नेसली एवढंच. लोकांच्या फर्माईशीवर डान्स केला म्हणून मी लावणी करते असं म्हटलं जातं, असं गौतमी पाटील म्हणाली.

वडिलांनी सांभाळलं नाही, तरीही गौतमी पाटील यशाचं श्रेय वडिलांना का देते?; काय आहे कारण?
gautami patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2023 | 8:46 AM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : सबसे कातिल गौतमी पाटील हिच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं. वडिलांची तिला तशी साथ मिळालीच नव्हती. बालपणापासून तिला आईनेच सांभाळलं. आईनेच लहानाचं मोठं केलं. आईनेच तिला शिक्षण दिलं. सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या. एवढंच कशाला इयत्ता आठवीत गेल्यावर गौतमीने पहिल्यांदा वडिलांना पाहिलं होतं. तोपर्यंत तिने वडिलांना पाहिलंही नव्हतं. आपल्याला वडील आहेत, हे मात्र तिला माहीत होतं. तिच्या यशात वडिलाचं काहीच योगदान नाही. तरीही गौतमी तिच्या यशाचं श्रेय वडिलानांच देते. त्याला कारणही तसंच आहे.

गौतमी पाटील हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या यशाचं सर्व श्रेय आईवडिलांना दिलं. माझ्या यशाचं श्रेय मी आई आणि वडिलांना देणार. वडीलसोबत असते तर आज मी इथपर्यंत आले नसते. मी डान्स क्षेत्रात आले नसते. आमच्या समाजात नृत्याच्या क्षेत्रात येऊ दिलं जात नाही. वडील असते तर त्यांनी मला या क्षेत्रात येऊ दिलं नसतं. उलट आज माझं लग्न झालेलं असतं. आता माझ्या हातात एक पोरगं तरी असतं, असं गौतमी पाटील म्हणाली.

वडिलांसोबतची पहिली भेट

मला वडील आहेत हे माहीत होतं. पण ते आपल्यासोबत राहत नाहीत, एवढंच मला माहीत होतं. त्याला कारणही तसंच होतं. वडील सतत दारू प्यायचे. त्यामुळे वाद व्हायचे. त्यामुळे आई आणि वडील सोबत राहत नव्हते. मलाही वाटायचं वडील सोबत असावेत. शाळेत यावेत. आपल्या भेटावेत, असं सांगताना गौतमीला अश्रू अनावर झाले.

वडील आले, पण…

जेव्ही मी आठवीनंतर पुण्याला जायला निघाले. तेव्हा आम्हाला कोण सांभाळणार हा प्रश्न होता. कारण माझे आजोबा (आईचे वडील) म्हातारे झाले होते. आम्हाला सांभाळणं त्यांना शक्य नव्हतं. म्हणून वडिलांना बोलावलं गेलं. त्यांना वॉचमनची नोकरी लावून दिली. घर घेऊन दिलं. पण कामाच्या ठिकाणीही त्यांनी मारामारी केली. दारूमुळे नोकरी सोडली. त्यांना आमच्यासोबत राह्यचं नव्हतंच. त्यामुळे ते गावाला गेले. आईनेच माझा सांभाळ केला. तिने पडेल ते काम करून मला शिकवलं, असं ती म्हणाली.

मी असेल नसेल…

हातात पैसा आल्यानंतर पहिल्यांदा आईचं मंगळसूत्र सोडवलं. कर्ज फेडलं. आता फ्लॅट घेतला. मी असेल नसेल किंवा माझं लग्न होईल. पण आईसाठी सर्व करून ठेवलं. वडिलांकडच्या संपत्तीचा विचारही केला नाही. तसं कधी मनातही येत नाही, असंही ती म्हणाली.