AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर त्याच्याशीच लग्न करेल, तोपर्यंत… गौतमी पाटील हिची दिल की बात, नवरा कसा हवाय?; काय आहेत अटी?

मला बघून लोक चेकाळतात त्याला मी काय करू. कोण झाडावर चढलं, कुणी हाणामारी केली हेच छापून येतं. पण माझा कार्यक्रम चांगला झाला असं कधीच छापून येत नाही. असं का होतं? कधी तरी माझ्या चांगल्या बातम्या द्या ना, असं गौतमी पाटील म्हणाली.

तर त्याच्याशीच लग्न करेल, तोपर्यंत... गौतमी पाटील हिची दिल की बात, नवरा कसा हवाय?; काय आहेत अटी?
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 11:06 AM

मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून ख्याती मिळवलेल्या गौतमीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. आता तर तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केल्याने तिची क्रेझ अधिकच वाढली आहे. गौतमीचा एकही कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला नाही असं होत नाही. तिच्या कार्यक्रमातील राड्यांची नेहमीच चर्चा होते. तर कधी पोलीस संरक्षण पुरवू शकत नसल्याने तिचा कार्यक्रम रद्द झाल्याच्या बातम्याही येत असतात. सध्या गौतमी पाटील हिची एका गोष्टीसाठी चर्चा सुरू आहे. ती म्हणजे गौतमी पाटील लग्न कधी करणार? गौतमीला नवरा कसा हवाय? तिच्या मनातील जोडीदार कसा आहे? याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय खुद्द गौतमीनेच या चर्चांना हवा दिल्याने ही चर्चा सुरू झाली आहे.

गौतमी पाटील हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नावर भाष्य केलं. मी लग्न करणार आहे, असं तिने स्पष्ट सांगून टाकलं. तसेच घरचेही लग्नासाठी तगादा लावत असल्याचं सांगतानाच मी घरच्यांकडे दुर्लक्ष करते असंही तिने सांगितलं. मी सध्या तरी लग्न लवकर करणार नाही. जेव्हा लग्नाचा विचार डोक्यात येईल आणि आई म्हणले तेव्हा लग्न करेल. पण लग्न कधी करते म्हणून माझ्या घरचे माझ्या मागे लागतात. मी त्याकडे लक्ष देत नाही. माझ्या मनात तो विषय नाही. मी अरेंज मॅरेज करणार आहे, असं गौतमी पाटील म्हणाली.

भेटला तर ठिक…

नवऱ्याकडून काय अपेक्षा आहेत. तो कसा असावा? असं तिला विचारलं असता तिने तिची अपेक्षा बिनधास्त सांगितली. माझं आयुष्य सर्वांना माहीत आहे. मी अनेक गोष्टीतून गेले आहे. अनेक संघर्ष केला आहे. त्यामुळे ते स्वीकारणारा पाहिजे. मी जे जे फेस केलं ते स्वीकारणारा पाहिजे. नशिबाने भेटला तर ठिक, असं ती म्हणाली.

आईला एकटी सोडू शकत नाही

मुलगा मीही पसंत करेल आणि माझी आईही. मी आईला एकटीला सोडू शकत नाही. माझ्याशिवाय तिला कुणी नाही. तिच्याशिवाय मला कुणी नाही. आई घरात एक दिवस नसेल तर माझी चिडचिड होते. त्यामुळे तिलाही सांभाळणारा जोडीदार असावा, असंही ती म्हणाली.

कार्यक्रमातच मागणी आली

मला बरीच मागणीही आली. मी कार्यक्रमाला गेलेले असतानाही मागणी आली, असं सांगताना तिने एक किस्साच सांगितला. एका गावात आमचा कार्यक्रम होता. त्यावेळी एक तरुण आला. तो आमच्या मॅनेजरला भेटला. मला गौतमीशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तिच्याशी भेट घालून द्या, असं म्हणाला. मॅनेजरने काम विचारलं. तो सांगेच ना. काम सांगितल्याशिवाय भेटता येणार नाही, असं मॅनेजरने त्याला सांगितलं. त्यावेळी त्याने गौतमीला मागणी घालायला आलोय असं सांगितलं, असं गौतमी म्हणाली.

आई समाधानी होते

कार्यक्रमात बुके मिळाला किंवा ट्रॉफी मिळाली तर मी रात्री उशिरा घरी गेल्यावरही आईला उठवून दाखवते. आजही माझा हा शिरस्ता आहे. आईला पुरस्कार आणि ट्रॉफीचा आनंद वाटतो. त्यात ती समाधानी होते, असं तिने सांगितलं.

त्या निव्वळ अफवाच

माझी एकूण 25 जणांची टीम आहे. त्यात 10 मुली आहेत. एवढे सर्व लोक माझ्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे माझ्यावर जबाबदारीचं ओझं आहे. मला त्याचं भान आहे. या सर्वांचा विचार करूनच आम्ही बिदागी घेतो. पण लोक आमच्या बिदागीबद्दल काहीही अफवा पसरवत आहेत. आम्ही खोटं बोलतोय असं वाटत असेल तर ज्यांनी ज्यांनी आमचे कार्यक्रम घेतले त्यांना हवं तर विचारा, असंही ती म्हणाली.

मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO
मुंबईच्या गिरगावात बेस्ट बस 5 फूट खोल खड्ड्यात पडली अन्... बघा VIDEO.
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला...
विमान अपघात LIVE शूट करणाऱ्या आर्यननं सांगितलं सारं काही, म्हणाला....
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?
शरद पवारांचे आमदार अस्वस्थ, लागले सत्तेचे वेध अन पवारांसमोर मोठा पेच?.
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात
DCM असलेले अजित दादा माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमनपादासाठी रिंगणात.
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?
मुंबईत रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? IMD चा अलर्ट काय?.
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार
5 मिनिटं पूल हलला अन् लोकं सावध ... बचावलेल्या पर्यटकानं सांगितला थरार.
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?
मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल घडलं काय?.
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO
बघता क्षणी पूल कोसळला, नेमकं काय घडलं? माणसं वाहून जातानाचा बघा VIDEO.
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; पर्यटकांना वाचवण्यासाठी पूल कापला.
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक
खंत वाटते वडील सोडून गेले... वैभवी देशमुख जाण्यानं भावूक.