सचिन वाझे स्वत:हून ATS समोर हजर; 10 तास कसून चौकशी, धनंजय गावडेंबद्दल काय म्हणाले?

| Updated on: Mar 11, 2021 | 10:02 AM

सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. (Sachin Vaze ATS Enquiry) 

सचिन वाझे स्वत:हून ATS समोर हजर; 10 तास कसून चौकशी, धनंजय गावडेंबद्दल काय म्हणाले?
sachin waze
Follow us on

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. (Sachin Vaze ATS Enquiry)

महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सचिन वाझेंचा जबाब

“मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही. धनंजय गावडेशी माझा संबध नाही. मी त्यांना ओळखतही नाही,” अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली आहे. तसेच सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केला होता. अशाप्रकारे पाळत ठेवल्याप्रकरणी वाझे एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची भेट घेणार आहे.

पुन्हा चौकशीची शक्यता

दरम्यान सचिन वाझे यांची सोमवारीही चौकशी करण्यात आली. वाझेंना दुपारी एटीएस कार्यालयात बोलावलं होतं. तिथं त्यांना  20 जिलेटिनसह मिळालेल्या स्कॉर्पियो प्रकरणाविषयी प्रश्न केले गेले. या प्रकरणात वाझे तपास अधिकारी होते.  मनसुख हिरेन यांच्या पत्नीने आपल्या स्टेटमेंटमध्ये एपीआय सचिन वाझे यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र एटीएसचे अधिकाऱ्यांकडून त्यांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.  (Sachin Vaze ATS Enquiry)

सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा

सचिन वाझे यांनी त्यांच्या गाडीचा एक गाडी पाठलाग करत असून त्याचा नंबर बनावट आहे, असा दावा केलाय. गाडीमध्ये पोलिसांचा बोर्ड लावून गाडीचा पाठलाग होतोय, असं वाझे म्हणाले. वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी एटीएसची असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी दावा केल्याप्रमाणे MH 45 7W 4887 ही गाडी त्यांच्या गाडीचा पाठलाग करतेय. मात्र, या गाडीचा नंबर हा बोगस असल्याचं एपीआय सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. या गाडीच्या बाजूला पोलीस लिहिलेला बोर्डही पाहायला मिळाला. शिवाय पुढच्या नंबरप्लेटवर MH ZW 4887 असा नंबर दिसतोय तर मागच्या नंबर प्लेटवर MH 7W 4887 असा नंबर दिसतोय. त्यामुळे या नंबरप्लेटशी छेडछाड केल्याचेही स्पष्ट होतंय.

वाझेंचा पाठलाग करणाऱ्या गाडीची चौकशी सुरु

मुंबई पोलिसांनी सचिन वाझे यांचा पाठलाग करणारी गाडी ताब्यत घेतली आहे. आता सचिन वाझे यांचा पाठलाग करणाऱ्या गाडीची चौकशी करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांकडून संबंधित गाडीच्या चारी बाजूनं बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. गाडीच्या आतमध्ये नंबर प्लेट आढळल्यानं ती गाडी नेमकी कुणाची हा प्रश्न निर्माण झालाय.

गृहमंत्र्यांची घोषणा

सचिन वाझेंना क्राईम ब्राँचमधून दुसऱ्या ठिकाणावर पाठवणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत घोषित केले. तर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सचिन वाझेंच्या अटकेची मागणी केली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली होती. (Sachin Vaze ATS Enquiry)

संबंधित बातम्या : 

फडणवीसांनी अधिवेशन गाजवल्याच्या चर्चा मात्र राऊत म्हणतात, ‘विरोधी पक्ष काय करतोय?’

सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, त्यांच्यासाठी अ‍ॅड. उद्धव ठाकरे आहेत, फडणवीसांचा जोरदार पलटवार

अर्णवला बेड्या ठोकल्या म्हणून सचिन वाझेला लटकवताय का? उद्धव ठाकरे आक्रमक