मुख्यमंत्री नुसत्या बैठकांच्या… MPSC च्या सचिवांना काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेडची पहिली प्रतिक्रिया, प्रकरणात तिघांना अटक

Sambhaji Brigade Santosh Shinde: MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांना आज संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर राज्यात वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडला. त्यावर संभाजी ब्रिगेडने खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री नुसत्या बैठकांच्या... MPSC च्या सचिवांना काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेडची पहिली प्रतिक्रिया, प्रकरणात तिघांना अटक
संभाजी ब्रिगेड संतोष शिंदे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 2:45 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना त्यांच्या कार्यालयात जात काळं फासण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासलं. राज्यात अगोदरच MPSC विरोधात वातावरण तापलेलं आहे. अनेक प्रमुख शहरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आज छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी विभागीय आयुक्तालयावर मोर्चा घेऊन गेले. अशावेळी ही घटना घडली. त्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते ॲड. संतोष शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठा इशारा सुद्धा दिला आहे. दरम्यान याप्रकरणात तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है

ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, असा गर्भीत इशारा संतोष शिंदे यांनी दिला. आता फक्त आयोगाच्या सचिवाला काळ फासले आहे पुढे आयोगाचे अध्यक्षाला ही काळ फासू असा इशारा शिंदे यांनी दिला. प्रेमासाठी पेपर फोडला जातोय. कशासाठी पेपर फोडला जातोय. आयोगाचे अध्यक्ष आणि सरकारचे काय लागेबंदे आहेत, असा आरोप त्यांनी केला. हे सरकार निष्क्रिय ठरलेलं आहे. निवेदन आंदोलन करून गेंड्याची कातडीचा असलेल्या सरकारला काही फरक पडत नाही. मुख्यमंत्री नुसत्या बैठकांच्या शिदोऱ्या हाणत आहेत. म्हणून संभाजी ब्रिगेडच्या आमच्या कार्यकर्त्यांनी आयोगाच्या सचिवाच्या तोंडाला काळ फासलं हे फार चांगलं केलं. आता जर सरकार काही निर्णय घेणार नसेल तर पुढचा नंबर आयोगाच्या अध्यक्षाचा असेल, असा इशाराही शिंदे यांनी दिला. संभाजी ब्रिगेड यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी तिघांना केली अटक

परीक्षा पेपर फुटी प्रकरणी संभाजी ब्रिग्रेड आक्रमक काही वेळापूर्वी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळी शाई फासली होती. त्यानंतर तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अधिक तपास बेलापूर पोलीस करीत असल्याची माहिती नवी मुंबईचे डीसीपी अमित काळे यांनी दिली.

संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते काल सचिवांना भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी चर्चा केली. यानंतर काही कागदपत्रे दाखवायची आहेत यासाठी आजची वेळ घेतली. आज परत एकदा सचिवांना भेटले.. यावेळी मोबाईल मध्ये कागदपत्र असल्याचे सांगून मोबाईल घेवून सचिव कार्यालयात गेले. यावेळी पुस्तक देण्याच्या बहाण्याने सचिंवा जवळ जात काळी फुकटी त्यांच्या अंगावर टाकण्यात आली. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एमपीएससी कार्यालयात प्रवेश देण्याबाबत काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us