नॅशनल पार्कातील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव, आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश

| Updated on: Sep 02, 2020 | 9:17 PM

वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. (Aarey 600 acres reserved for forest)

नॅशनल पार्कातील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव, आदिवासींचे हक्क अबाधित ठेवण्याचे निर्देश
Follow us on

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात झाला. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशारितीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. (Aarey 600 acres reserved for forest Said CM Uddhav Thackeray)

आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.

आदिवासींचे हक्क अबाधित

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 लावण्यात येऊन त्यानुसार 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात येतील. त्या सूचना आणि हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.

सर्व प्रकारची बांधकामे, रस्ते, झोपड्या आणि आदिवासी पाडे तसेच इतर शासकीय सुविधा या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात येतील.

त्याचबरोबर येथील झोपड्यांचे पुनर्वसनही तातडीने सुरु केले जाईल. या संपूर्ण कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव हा वन विभागामार्फत लवकरच सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच आरे येथील वनसंपदा संरक्षित होणार आहे. (Aarey 600 acres reserved for forest Said CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

नागपूरच्या नवनियुक्त आयुक्तांचा तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल, तब्बल 66 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

धार्मिक स्थळं, जिम आणि रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय लवकरच : अनिल परब