2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav)आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली.

2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा
2024 पर्यंत आम्हाला सहन करायचंय, स्थायी समिती अध्यक्षांच्या घरावरील आयकराच्या धाडीनंतर राऊतांचा सूचक इशारा
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 10:45 AM

मुंबई: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav)आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी सूचक इशारा दिला आहे. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. महाराष्ट्राला सहन करावं लागेल. पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावं लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही छापेमारी सुरू झाल्याचा दावाही राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला. दरम्यान, यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच ती रक्कम युएईला ठेवली असल्याची चर्चा आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनीही जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आज त्यांच्या घरावर छापे मारण्यात आले आहेत.

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होत आहे. उद्या महापालिकेच्या शिपायांवरही रेड टाकतील. महापालिकेतील काही शिपाई धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत. शिवसेनेवर त्यांचं प्रेम आहेत. त्यामुळे ते धनुष्यबाण लावतात. आता आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करायचं आहे. महाराष्ट्राला सहन करायचं आहे. पश्चिम बंगालला सहन करायचं आहे. उत्तराखंडला सहन करायचं आहे. पंजाबलाही सहन करायचं आहे, असं शिवसेना राऊत म्हणाले.

डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे

आदित्य ठाकरे काल उत्तर प्रदेशात होते. त्यांचा झंझावात सर्वांनी पाहिला. आदित्य ठाकरेंना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तिथेही आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सध्याचे सत्ताधारी डर्टी पॉलिटिक्स करत आहेत असं आदित्य यांनी सांगितलं. डर्टी पॉलिटिक्स सुरू आहे. डर्टी पॉलिटिक्स करणारे डर्टी ट्वेल्स आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आमच्या तोंडून सत्यच बाहेर येईल

आपल्या विचाराचं सरकार आलं नाही म्हणून इतर पक्षाच्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणाच्या बळावर चिरडून टाकण्याचं काम सुरू आहे. तुमचे लोकं रोज गंगेत आंघोळ करून पाप करतात. त्यामुळे गंगा मैली झाली आहे. आमच्यावर खोटे गुन्हा देखल करा, केंद्रीय सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा. आमचे गळे आवळण्याचं काम करा. आमच्या तोंडून सत्यच बाहेर पडेल. कितीही त्रास द्या. आमच्या तोंडून सत्यच बाहेर येईल, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

यशवंत जाधवांचे दोन कोटींचे व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात, सोमय्यांच्या रडारवर शिवसेनेचे कोण कोण ?

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

सुगंधी चंदनाची इनोव्हातून तस्करी; नाशिकमध्ये ‘पुष्पा’ला बेड्या, कितीचे घबाड सापडले?