ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात, संजय राऊत यांची रोखठोक टीका

| Updated on: Nov 28, 2021 | 7:37 AM

गेल्या दोन वर्षात सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात, संजय राऊत यांची रोखठोक टीका
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये दोन वर्षांचा काळ सरला! राज्य किती पुढं गेले या नावानं रोखठोक लिहिलं आहे. राऊत यांनी रोखठोकमधून विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या दोन वर्षात सरकार पाडू न शकणारा विरोधी पक्ष सरकार पाडण्याच्या नव्या तारखा देतो हा विनोद म्हणावा लागेल. ठाकरी बाण्यानं राज्यातील विरोधी पक्ष दिशाहीन झालाय, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या तारखा देण्याच्या फंदात आणि छंदात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरका आता लवकरचं पडेल असं म्हटलंय. भाजप तारखा देण्याच्या फंदातून आणि छंदातून बाहेर पडलेला नाही. चंद्रकांत पाटील नव्या सरकारचा शपथविधी मध्यरात्री करणार की पहाटे असा सवाल राऊत यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजप कार्यकारिणीत सरकार पडेल आणि आपण सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षानं बाहेर पडावं, असं म्हणणारे पुन्हा ठाकरे सरकार पडेल असं सांगतात. त्यांनी आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी, असा सल्ला संजय राऊत यांनी भाजपला दिला.

ठाकरे सरकार पुरुन उरलं

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले. विरोधी भाजपनं ठाकरे सरकारला बदनाम करण्यासाठी आणि कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले. राजकारणातील कमरेखालचे वार करुनही सरकार कायम आहे, असं संजय राऊत म्हणाले.

विरोधी पक्षाची अ‌ॅचिव्हमेंट

भ्रष्टाचाराचे व गैरव्यवहाराचे आरोप करणं सुरु, सुशांतसिंह राजपूत सारख्या प्रकरणांना राजकीय रंग देत ठाकरे कुटुंब आणि सरकारची बदनामी करणे, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून राज्यावर चिखलफेक, परमबीर सिंह यांनी फरार होणं, फरारी परमबीर सिंह यांच्या आरोपावरुन अनिल देशमुखांना तुरुंगात टाकणं, एकनाथ खडसेंच्या जावयाला तुरुंगात टाकणं, शिवसेना आमदार खासदारांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून धमकावणं, नवाब मलिक यांच्या जावयाला खोट्या प्रकऱणात तुरुंगात टाकणं, ठाकरे आणि पवार कुटुंबीयांवर खोटे आरोप करणे. पवारांच्या नातेवाईंकावर आयटीच्या धाडी, एसटी संप चिघळवण्यासाठी भाजपनं प्रयत्न, अमरावतीमध्ये जातीय दंगे भडकवणं हे सर्व करुन ही भाजप ठाकरे सरकारला चरोटाही पाडू शकलं नाही. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

नोटाबंदी, कोरोना व्यवस्थापनातील अनांगोदी, तीन कृषी कायद्यांवर घ्यावी लागेलली माघार यावरुन संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. कोरोनाच्या काळात निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडातील व्यवहारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय, यावर भाजपचे ऑडिटर जनरल किरीट सोमय्या बोलायला तयार नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

उद्धव ठाकरेंचा चेहरा आश्वासक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे, ते लोकांमध्ये प्रिय आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा आश्वासक होता.हाच माणूस संकटातून रक्षण करेल, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला होता, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळं राज्यावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले असल्याचं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

कडाक्याच्या थंडीतही हर्षवर्धन पाटलांचे आंदोलन सुरूच; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

Parliament Winter Session: हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक तास आधी विरोधी पक्षनेत्यांची बैठक, सरकारला घेरण्याची रणनीती ठरवणार

Sanjay Raut slam BJP in his article RokhThok said opposition party is trying to defame Maharashtra Government