कडाक्याच्या थंडीतही हर्षवर्धन पाटलांचे आंदोलन सुरूच; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

कडाक्याच्या थंडीतही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे. वीजबिल न भरल्याने महावितरणकडून काही शेतकऱ्यांचा वीजपुरवाठ खंडीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती.

कडाक्याच्या थंडीतही हर्षवर्धन पाटलांचे आंदोलन सुरूच; शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

इंदापूर : कडाक्याच्या थंडीतही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे आंदोलन सुरूच आहे. वीजबिल न भरल्याने महावितरणकडून काही शेतकऱ्यांचा वीजपुरवाठ खंडीत करण्यात आला आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. त्यांनी आपल्या या मागणीसाठी शनिवारी महावितरण कंपनीच्या दारासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. इंदापूर परिसरामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र या कडक्याच्या थंडीतही हर्षवर्धन यांचे आंदोलन सुरूच आहे. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान

तालुक्यात वीजबिल थकल्याने महावितरणकडून अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मात्र ऐन रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणने शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी हर्षवर्धन यांनी केली होती. मात्र चर्चा फीसकटल्याने अखेर हर्षवर्धन पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह महावितरणच्या दारात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. रात्री आठ वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रात्रभर कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरूच होते.

पाटलांनी केले शेतकऱ्यांसोबत जेवण 

दरम्यान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा साधेपणा पुन्हा एकदा दिसून आला, त्यांनी आंदोलनस्थळीच शेतकऱ्यांसोबत जेवण केले. त्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या पिठलं भाकरीचा अस्वाद घेतला. त्यानंतर पाटील यांनी रात्रभर  कडक्याच्या थंडीत महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या 

सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल; भुजबळांनी उडवली खिल्ली

मेट्रो मार्गिका-3 प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI