Kirit Somaiya : 6 ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात हजर व्हायचंय, किरीट सोमय्या म्हणाले, मला काळजी वाटते!

| Updated on: Aug 04, 2022 | 7:10 PM

संजय राऊत यांच्या नावानं वारंट काढलं होतं. आता राऊत हे जामिनावर आहेत. 6 ऑगस्टला सुनावणी आहे.

Kirit Somaiya : 6 ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात हजर व्हायचंय, किरीट सोमय्या म्हणाले, मला काळजी वाटते!
किरीट सोमय्या म्हणाले, मला काळजी वाटते!
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यामुळंच प्रवीण राऊत (Praveen Raut) हे म्हाडाच्या पत्राचाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकली. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीने तपासाची दिशा निश्चित केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यासंदर्भात म्हणाले, मला काळजी वाटते. मला काळजी वाटते. 6 ऑगस्टला संजय राऊत यांना शिवडी कोर्टात (Shivdi Court) हजर व्हायचं आहे. प्रोफेसर मेधा किरीट सोमय्या (Medha Somaiya) मानहानी प्रकरणात कोर्टाने आदेश दिले आहेत. 6 ऑगस्टला पोलीस संजय राऊत यांना हजर करणार की नाही याची काळजी वाटत आहे.

पाहा व्हिडीओ

मुक्काम पोस्ट ऑर्थर रोड किती दिवस?

किरीट सोमय्या म्हणाले, एकंदर जे प्रकरण दिसत आहे. नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत. पुढं फॉरेन टूर दुबई, चायना गेले होते. इथली प्रॉपर्टी, तिथली प्रॉपर्टी कोट्यवधी रुपयांचे कॅश ट्रांजेक्शन, मुक्काम पोस्ट ऑर्थर रोड. किती महिने हे सांगता येत नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

राऊतांना 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते

मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी न्यायालयानं सांगितलं की, तक्रारीत तत्थ्य दिसते. त्यामुळं संजय राऊत यांच्या नावानं वारंट काढलं होतं. आता राऊत हे जामिनावर आहेत. 6 ऑगस्टला सुनावणी आहे. मला खात्री आहे की, मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊत यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.

काय आहे प्रकरण

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर मिरा-भयंदर परिसरात 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केलाय. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप मेधा यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर मेधा यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. कारण संजय राऊत यांनी माफी मागितली नाही.