मुंबईतील सर्वाधिक मृत्यूची वेळ, स्थळ आणि वार

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मायानगरी मुंबईत मृत्यू हा कुठे तुमची वाट पाहत बसलेलाय हे सांगणं कठिणंय.. पण हा मृत्यू कोणत्या वेळेत आणि कोणत्या दिवशी मुंबईकरांचे जास्त जीव घेतो, त्याचं एक संशोधन समोर आलंय. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि आयआयटी बॉम्बे यांच्या अहवालातून मुंबईकराच्या मृत्यूची वेळ समोर आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे या जीवघेण्या अपघातांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये 20 टक्क्यांनी […]

मुंबईतील सर्वाधिक मृत्यूची वेळ, स्थळ आणि वार
Follow us on

मुंबई : मायानगरी मुंबईत मृत्यू हा कुठे तुमची वाट पाहत बसलेलाय हे सांगणं कठिणंय.. पण हा मृत्यू कोणत्या वेळेत आणि कोणत्या दिवशी मुंबईकरांचे जास्त जीव घेतो, त्याचं एक संशोधन समोर आलंय. जॉन हॉपकिन्स विद्यापीठ आणि आयआयटी बॉम्बे यांच्या अहवालातून मुंबईकराच्या मृत्यूची वेळ समोर आलीय. महत्त्वाची बाब म्हणजे या जीवघेण्या अपघातांमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये 20 टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती मुंबई वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

तुम्ही कामासाठी साधारणपणे सकाळच्या वेळेला बाहेर पडता. हीच वेळ सर्वात धोकादायक ठरल्याचं अहवालात म्हटलंय. शिवाय रात्री घरी येण्याची जी वेळ असती ती सर्वाधिक जीवघेणी आहे. कोणत्या वेळेत जास्त अपघात होतात ते पाहा,

मुंबई ही रात्रीही धावत असते म्हणतात ते खरंय. कारण मध्यरात्री रात्री 1 ते 2 – 64 अपघात होतात

2 ते 3 – 56

3 ते 4 – 66

पहाटे 4 ते 5 – 59

5 ते 6 – 45

6 ते 7 – 62

7 ते 8 – 54

8 ते 9 – 61

9 ते 10 – 61

10 ते 11 – 74

11 ते 12 – 65

दुपारी 12 ते 1 – 74

1 ते 2 – 64

2 ते 3 – 71

3 ते 4 – 70

4 ते 5 – 80

ही वेळ आहे ऑफिसमधून बाहेर पडण्याची, जिथेच सर्वाधिक वर्दळ असते

संध्याकाळी 5 ते 6 – 67

6 ते 7 – 89

7 ते 8 – 81

सर्वाधिक धोकादायक वेळ आहे 8 ते 9 – या वेळेत 103 अपघात होतात

9 ते 10 – 97

रात्री 10 ते 11 – 62

11 ते 12 – 63

रात्री 12 ते 1 – 75

हा झाला मृत्यूचा मुहूर्त, पण आता कोणत्या दिवशी जास्त अपघात जास्त होतात तेही पाहा

आठवड्याच्या सुरुवातीलाच सरासरी 250 अपघात

मंगळवार – 215

बुधवार – 202

गुरुवार – 266

शुक्रवार – 220

शनिवार – 248

आणि मुंबईकर रविवारची सुट्टी साजरी करायला बाहेर पडतात तेव्हा सरासरी मुंबईत 262 अपघात होतात

मृत्यूची वेळ पाहिली, वार पाहिला आणि स्थळं पाहा.. यावर्षी 31 ऑक्टोबरपर्यंतची ही आकडेवारी आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर सर्वाधिक 57 मृत्यू झालेत

पूर्व द्रुतगती मार्ग – 53

व्ही. एन. पुरव मार्ग – 26

लाल बहादूर शास्त्री रोड – 20

स्वामी विवेकानंद रोड – 14

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड – 12

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड म्हणजेच जेव्हीएलआर – 9

न्यू लिंक रोड – 9

सेनापती बापट मार्ग – 8

बाबासाहेब आंबेडकर मार्ग – 7

वाहतूक पोलीस रात्री-अपरात्री थांबवून चेक करतात म्हणून अनेकांना त्याचा राग येत असेल. पण ते आपल्या जीवासाठीच हे सगळं करतात हे आकडेवारी पाहिल्यावर समजतं. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन वर्षांपासून हेल्मेट सक्ती, सीटबेल्ट वापर, ड्रंक आणि ड्राईव्ह करणाऱ्यांना चाप, वेग नियंत्रण अशा विविध माध्यमातून अपघातांचं प्रमाण कमी केलंय. पण हा आकडा आणखी कमी करणं हे वाहन चालवणाऱ्या तुमच्या-आमच्या हातात आहे.