घर खरेदी -विक्रीत सर्व्हरचा अडथळा; स्टॅम्प ड्युटी नोंदणी सर्व्हर क्रॅश; नागरिकांचे कार्यालयात हेलपाटे

| Updated on: Jun 02, 2022 | 9:15 AM

मुंबईत घर खरेदी विक्री किंवा घर भाड्याने देणे याबाबतचे व्यवहार स्टॅम्प ड्युटीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयाचे सर्व्हर क्रॅश असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

घर खरेदी -विक्रीत सर्व्हरचा अडथळा; स्टॅम्प ड्युटी नोंदणी सर्व्हर क्रॅश; नागरिकांचे कार्यालयात हेलपाटे
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबईत (Mumbai) घरासंदर्भात कोणताही व्यवहार करायचा असेल तर तो स्टॅम्प ड्युटीशिवाय (Stamp duty) होऊ शकत नाही. मग ती घराची खरेदी, विक्री असेल किंवा मालमत्ता भाड्याने द्यायची असेल, अशा सर्व व्यवहारांमध्ये आधी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आणि मगच पुढची कार्यवाही होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयाचे सर्व्हर क्रॅश (Server crash) होत असल्याने ग्राहकांना स्टॅम्प ड्युटीची नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्राहकांना स्टॅम्प ड्युटीसाठी कार्यलयाचे खेटे मारावे लात आहेत. घर खरेदी विक्री किंवा भाडे करार या माध्यमातून राज्य सरकारला दररोज कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र तरी देखील गेल्या काही दिवसांपासून स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयाचे सर्व्हर क्रॅश होत असल्याने सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लवकरता लवकर सर्व्हरचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.

कोरोनानंतर घर खरेदी विक्रीत वाढ

देशात गेले दोन वर्ष कोरोना महामारीचे संकट होते. राज्यात विशेषत: मुंबईमध्ये कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. लॉकडाऊन लावण्यात आल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. या काळात अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. रोजगार नसल्याने अनेक जण आपल्या गावी गेले होते. मात्र आता कोरोना संकट टळल्याने निर्बंध उठवण्यात आले आहेत. निर्बंध उठवण्यात आल्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रोजगार मिळाल्याने अनेक जण मुंबईत परतले आहेत. तसेच हातात पैसा आल्याने घर खरेदी विक्रीचे व्यवहार देखील वाढले आहेत. कामगार मुंबईत परतल्याने घर भाड्यांच्या व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. तसेच घर खरेदी विक्रीचे प्रमाण देखील वाढले आहे. मात्र स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयाचे सर्व्हर वारंवार क्रॅश होत असल्याने असे व्यवहार पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयाचे खेटे मारण्याची वेळ आली आहे.

हे सुद्धा वाचा

सर्व्हर क्रॅशच्या तक्रारी वाढल्या

घर खरेदी करताना किंवा भाड्याने देताना भाडे करार तसेच स्टॅम्प ड्युटी आवश्यक आहे. त्याशिवाय मुंबईत कुठलाही व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. स्टॅम्प ड्युटी नोंदणी कार्यालयात जाऊन स्टॅम्प ड्युटी भरावी लागते किंवा ऑनलाईन पेमेंट भरावे लागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी भरताना सर्व्हर क्रॅश होत असल्याच्या तक्रारी मुंबईमधून वाढल्या आहेत. सरकारने या प्रकरणात लवकरात लवकर लक्षा घाऊन समस्या मार्गी लावावी अशी मागणी करण्यात येत आहे.