“सामना कोण वाचतो, सामन्यातील टिकेला आम्ही भीक घालत नाही.”; विरोधकांच्या टीका शिंदे गटानं धुडकावून लावली…

| Updated on: Jan 26, 2023 | 4:20 PM

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरचा आमचा हा माघी गणेशोत्सव सोहळा होतो आहे. त्यामुळे देवाचरणी हीच प्रार्थना की राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.

सामना कोण वाचतो, सामन्यातील टिकेला आम्ही भीक घालत नाही.; विरोधकांच्या टीका शिंदे गटानं धुडकावून लावली...
Follow us on

मुंबईः राज्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका लागल्यापासून आणि धनुष्यबाणासाठी न्यायालयीन लढा सुरु झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या घरी माघी गणेशोत्सवानिमित्ताने गेले होते. त्याबद्दल राहुल शेवाळे यांनी आनंद व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी त्यांना शक्ती आणि ताकद दे अशी मागणी त्यांनी राहुल शेवाळे यांच्याकडे केली आहे.

ठाकरे गटावर खासदार राहुल शेवाळे यांनी टीका करताना उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सामना वृत्तपत्रावरही त्यांनी सडकून टीका केली आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडायला सुरुवात केली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी ठाणे दौरा केला. त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, पण आता त्याचा त्यांना काही फायदा होणार नाही.

आणि त्याचा काही त्यांना उपयोगही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हे त्यांनी दोन वर्षापूर्वीच करायला पाहिजे होतं मात्र त्यांनी ते केलं नाही आता दौरे करण्यात काहीच फायदा नसल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

त्यांनी आता दौरे आणि इतर काही गोष्टी केल्या तरी उद्धव ठाकरे यांना जे गेलंय ते आता पुन्हा मिळणार नाही, आम्ही फार लांब निघून गेलो आहे. त्यामुळे त्यांनी व्यर्थ प्रयत्न करू नये असंही राहुल शेवाळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

यावेळी त्यांना सामना वृत्तपत्रातून आज पुन्हा एकदा तुमच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्याविषयी विचारणा केल्यावर मात्र त्यांनी सामना वृत्तपत्राला निकालात काढत सामना कोण वाचतो, सामन्यातील टिकेला आम्ही भीक घालत नाही आणि ते शेवटी ऊद्धव ठाकरेंचं मुखपत्र आहे अशी जहरी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे

राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतरचा आमचा हा माघी गणेशोत्सव सोहळा होतो आहे. त्यामुळे देवाचरणी हीच प्रार्थना की राज्याचा सर्वांगीण विकास व्हायला हवा अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.

काही दिवसानंतर संसदीय अर्थसंकल्प सुरू होतं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हे त्यांच्या गटातील सर्व खासदारांबरोबर संवाद साधणार आहेत. कोवीडनंतर राज्यात कशा पद्धतीने विकास कामं होतील,

जीएसटीचा पैशांचा विषय त्यासोबत इतर विषयही मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही सर्व 13 खासदार राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.