रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांचा नोंदवला जबाब

| Updated on: Apr 09, 2022 | 4:22 PM

राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचेन नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांचा नोंदवला जबाब
कुठली तरी अज्ञात शक्ती, राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी आज शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राजकीय नेत्यांचे फोन टॅप प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या आहेत. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच रश्मी शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकेपासून संरक्षण मिळवले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यात आज संजय राऊत यांचा जबाब दैनिक सामनाच्या प्रभादेवीच्या कार्यालयात येऊन जबाब नोंदवण्यात आला आहे. या साऱ्या प्रकाराबाबत अजून तरी संजय राऊत यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

नेमके प्रकरण काय?

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. त्यात काँग्रेस नेते नाना पटोले, संजय काकडे, आशिष देशमुख, बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणावरून ठाकरे सरकारने चौकशी सुरू केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृहमंत्रीपदही होते. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून हे फोन टॅप करण्यात आले का, असा संशय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना आहे. या चौकशीतून काय समोर येते, ते पाहावे लागेल.

काय आहेत नियम?

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारने फोन टॅपिंगबाबत केलेले काही नियम सांगितले होते. त्यानुसार राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी जी कारणे दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आले, अशीही माहिती त्यांनी दिली होती.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!