Shiv Sena: मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार, प्रचंड ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकवू , आदित्य ठाकरेंचा विश्वास, म्हणाले, जे पळाले…

| Updated on: Jul 04, 2022 | 2:28 PM

ज्यांचा जन्म आमचा पक्ष पोखरण्यासाठीच झाला आहे, ते दुसरीकडे जाऊनही तेच करतील, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

Shiv Sena: मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार, प्रचंड ताकदीने पुन्हा विधानसभेत भगवा फडकवू , आदित्य ठाकरेंचा विश्वास, म्हणाले, जे पळाले...
मध्यावधी निवडणुकांसाठी शिवसेना तयार-आदित्य ठाकरे
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई – मध्यावधी निवडणुकांसाठी (mid term election)शिवसेना तयार आहे, प्रचंड ताकदीनं शिवसेना (Shivsena)विधानसभेत पुन्हा दिमाखात भगवा फडकवून दाखवेल, असा आत्मविश्वास पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचा (Aaditya Thackeray)व्यक्त केला आहे. या सरकारबाबत बोलताना त्यांनी या प्रकरणी कोर्टात लढाई सुरु आहे, आमचा व्हीप हाच खरा व्हीप असल्याचे सांगत, हे आम्ही कोर्टात सिद्ध करु, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पुन्हा एकदा शिवसेना उभी करण्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांची महत्त्वाची बैठक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली असून, त्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घएतील अशी शक्यता आहे.

जे पळाले.. त्यांना शिवसेना संपवायची होती

जे पळाले, त्यांना शिवसेना संपवायची होती, अशी जोरदार टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेनंतर मी गेलो होतो रात्री अडीच वाजता, पण तिथले स्थानिक आमदार गुवाहाटीत पार्टी करत होते, असं सांगत यानिमित्ताने त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मतदारांना बंडखोर आमदारांना कधी तरी तोंड द्यावं लागेलच, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे. जे बंडखोर आमदार आपल्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत नव्हते, ते मतदारसंघात मतादारांना कसे सामोरे जाणार, असा सवाल काल आदित्य ठाकरेंनीच उपस्थित केला होता. त्याचाच धागा पकडत मतदारसंघात काय कराल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची झाली होती विचारणा

20 मे रोजी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलं होतं, त्यावेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय का, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली होती. असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी ती ऑफर नाकारली होती, असेही यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. ज्यांचा जन्म आमचा पक्ष पोखरण्यासाठीच झाला आहे, ते दुसरीकडे जाऊनही तेच करतील, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

कालची विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अवैध

काल सभागृहात झालेली विधानसभा उपाध्यक्षांची निवडणूक वैध नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्या पक्षाने व्हीप लागू करुनही आमदारांनी तो पाळला नाही, असे सांगत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गटनेते आणि प्रतोद पद रद्द झाल्यावर उद्धव ठाकरे सक्रिय

विधीमंडळ सचिवालयातून काल रात्री एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील, अशी मान्यता देणारे पत्र शिंदे गटाला देण्यात आले आहे. तसेच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. याबाबत पुढील कायदेशीर भूमिका ठरवण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. त्यात पुढी भूमिका आणि दौरा निश्चित होण्याची शक्यत आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना आता आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि शिवसेना हा संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.