पुतिन यांच्या भारत भेटीनंतर असे काय घडले की, थेट डोनाल्ड ट्रम्प यांनी केला काैतुकाचा वर्षाव, भारताबद्दल…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. एकीकडे भारतावर निर्बंध लादतात तर दुसरीकडे भारताचे काैतुक करताना दिसतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारताबद्दल मोठे विधान केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत भारताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. मात्र, एकीकडे भारतावर निर्बंध लादले जात आहेत तर दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करताना डोनाल्ड ट्रम्प दिसतात. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहे. नुकताच यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले. फक्त काैतुकच नाही तर त्यांनी नरेंद्र मोदी यांना महान मित्र म्हणूनही संबोधले. भारत हा इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिकेसाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली. अनेक वर्ष भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले राहिले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून हे संबंध वाईट स्थितीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने हे संबंध अधिकच ताणले गेले. एकीकडे भारतावर निर्बंध लादायचे आणि दुसरीकडे भारताचे काैतुक करायचे ही दुटप्पी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताचे वर्णन सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून केले आहे. त्यांनी लिहिले की, भारत हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक घर आहे. हा एक अद्भुत देश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात तो अमेरिकेचा एक महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे. पंतप्रधान मोदींच्या रूपात आम्हाला एक महान मित्र नक्कीच मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद झाल्याचे सांगितले जाते. दोन्ही देशातील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात असताना हा संवाद झाल्याने अधिक महत्वप्राप्त झाले. भारत आणि अमेरिकेत फक्त व्यापार चर्चा सुरू आहेत. मात्र, अजूनही करार झाली नाहीत. अमेरिका भारतावर दबाव टाकत असतानाच रशियाचेय अध्यक्ष पुतिन भारताच्या दाैऱ्यावर आले.
भारत आणि रशियात अनेक करार पुतिन करून गेले. काही मंत्र्यांनाही त्यांनी या दाैऱ्यावर आणले आणि झटपट करारही पूर्ण केले. ऑगस्टमध्ये अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील शुल्क वाढवून 50 टक्के केले. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये सध्या व्यापार चर्चा सुरू आहे. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार यशस्वी झाले तर कदाचित भारतावर लावलेला शुल्क कमी होऊ शकते असे सांगितले जात आहे.
