Sanjay Nirupam : ‘हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना….’ संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?

Sanjay Nirupam : "ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला आहे. ठाकरे गटाचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत" असं संजय निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam :  हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना.... संजय निरुपम मराठी vs हिंदी वादात काय म्हणाले?
sanjay nirupam
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 18, 2025 | 11:39 AM

“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की, वक्फ बोर्डमध्ये कुठल्या प्रकारचा पॅनल नाही. वक्फ ही धार्मिक संस्था नाही, तर एक सरकारी संस्था आहे” असं शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले. हिंदी भाषा शिकण्याविषयी सुद्धा संजय निरुपम बोलले. “हिंदीमध्ये काहीही चूक नाही, महाराष्ट्रातील सर्व मुलांना मराठी शिकणे अनिवार्य आहे. मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही” असं संजय निरुपम बोलले. “जे हिंदीला विरोध करतात, ते इंग्रजीला विरोध करत नाहीत. त्यांची मुले इंग्रजीत शिकतात, ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत” असं संजय निरुपम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या AI भाषणावरुन त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली. “मी ठाकरे शिवसेनेच्या लोकांना सांगू इच्छितो की, ठाकरे गट स्वतःच कृत्रिम झाला आहे, तो बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात झाला आहे. ठाकरे यांची शिवसेना वक्फला पाठिंबा देते”

‘हिंदी ही देशाची भाषा आहे’

हिंदीच्या सक्तीवरून संजय राऊत यांनी टीका केली, त्यावर निरुपम म्हणाले की, “इंग्रजी हा परदेशी विषय आहे. पण हिंदी ही देशाची भाषा आहे आणि आपण ती शिकली पाहिजे. ठाकरे गटाचे नेते बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे विचार घेऊन पुढे जात आहेत आणि त्यावर काम करत आहेत” “काही मनसे नेत्यांची मुले जर्मन आणि इंग्रजी शिकत आहेत. पण ते हिंदीला विरोध करतात” असं निरुपम म्हणाले.