मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात पहावं लागेल, राऊतांचा चिमटा घेत मोदींचं तोंडभरू स्तुती

| Updated on: Sep 17, 2021 | 10:39 AM

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेलं. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही. (shivsena leader sanjay raut wishes pm narendra modi on birthday)

मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात पहावं लागेल, राऊतांचा चिमटा घेत मोदींचं तोंडभरू स्तुती
संजय राऊत आणि नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेलं. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींचं तोंडभरून कौतुक करतानाच मोदी संध्याकाळी कोणता केक कापतात, ते पाहावं लागेल, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत यांनी काढला. (shivsena leader sanjay raut wishes pm narendra modi on birthday)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी शुभेच्छा देतानाच त्यांचं भरभरून कौतुकही केलं. मोदींमुळे देशाला राजकीय स्थैर्य लाभलं. भाजप कायम आघाड्या करून सत्तेत येत होता. वाजपेयींनंतर त्यांनी भाजपला शिखरावर नेलं. मोदींच्या नेतृत्वात भाजप एकहाती सत्ता घेऊन आली. त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिलं. ही त्यांच्या नेतृत्वाची कमाल आहे. त्यांच्या तोडीचा आज दुसरा नेता देशात दिसत नाही, असं राऊत म्हणाले.

मोदींचं कार्य, भूमिका आणि नेतृत्वाबद्दल कितीही विरोध असला तरी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मोदी हे मोदी आहेत. दुसरे मोदी होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. तसेच संध्याकाळी वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे पाहावं लागेल. देशातील जनतेच्या महागाईच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच असतील. पेट्रोल डिझेल कमी करणारा केक मोदी कापतील असं वाटतं, असा चिमटाही त्यांनी मोदींना काढला.

चंद्रकांत पाटील अवतारी

यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोले लगावले. चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्मयाची त्यांची वेदना समजू शकतो. मी त्यांना निरोप पाठवला आहे. तुम्हाला 25 वर्षे माजी मंत्री म्हणूनच राहावे लागेल. उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.

म्हणून सोनू सूद दुश्मन झाला का?

सोनू सूद यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोनू सूद लोकांना मदत करत होते. त्यावेळी खूप वाद झाला. तेव्हा भाजप आम्हाला सांगत होता हा एकटा माणूस कसा काम करत आहे. सरकार काही करत नाही. त्यावेळी सोनू सूदचा राज्यपालांनी सत्कारही केला होता. परंतु, केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात भाग घेतला. तो केजरीवाल सरकारचा ब्रँड अम्बेसेडर झाला. म्हणून तो त्यांचा दुश्मन झाला. त्यानंतरच त्याच्यावर कारवाई सुरू झाली. सोनूच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी टाकल्या. आयकरच्या धाडी हा तर रडीचा डाव आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (shivsena leader sanjay raut wishes pm narendra modi on birthday)

 

संबंधित बातम्या:

LIVE : संत विद्यापीठ ते शिर्डी-औरंगाबाद हवाई प्रवास, मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

हा आमचा विकास नव्हे, आमचा विकास अजून दिसायचा आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यासाठी 8 मोठ्या घोषणा

PM Modi Untold Stories : लहानपणी मगरीचं पिल्लू पकडून घरी आणलं, नरेंद्र मोदींचे 10 भन्नाट किस्से

(shivsena leader sanjay raut wishes pm narendra modi on birthday)