AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आवाज आला अन् धुरळा उडाला… मुंबईत पत्त्यासारखी जुनी इमारत कोसळली, एकच खळबळ

मुंबईच्या मदनपुरा येथे एक इमारत कोसळण्याची माहिती मिळतंय. इमारत कमकुवत आणि फार जुनी असल्याची माहिती पुढे. मात्र, इमारत अचानक पडल्याने मोठा आवाज झाला. काही कळण्याच्या आतच हवेत धूर झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती मिळतंय.

मोठी बातमी! आवाज आला अन् धुरळा उडाला... मुंबईत पत्त्यासारखी जुनी इमारत कोसळली, एकच खळबळ
collapse building mumbai
| Updated on: Aug 04, 2025 | 12:50 PM
Share

मुंबईच्या मदनपुरा येथे एक इमारत कोसळण्याची माहिती मिळतंय. इमारत कमकुवत आणि फार जुनी झाली होती. पोलिस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणीही यामध्ये जखमी झाले नाही. पोस्ट ऑफिसच्या शेजारी ही इमारत होती. लोक रस्त्यावर होती, आपआपली काम करत असताना एक अत्यंत मोठा आवाज आला आणि धुरळा उडाला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कोणाला काहीच कळत नव्हते. नेमके काय सुरू आहे.

मुंबईत चक्क पत्त्यासारखी पडली जुनी इमारत 

चक्क पत्त्यासारखी ही जुनी इमारत पडली. इमारतीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती मिळताच ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले. इमारत जुनी होती, त्यामुळे याठिकाणी कोणी राहत नसल्याचे माहिती मिळतंय. यामुळे जखमी कोणीही झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या आजुबाजूला देखील काही इमारती आहेत. मात्र, त्यांचे काही नुकसान झाले नसल्याची माहिती मिळतंय.

सुदैवाने जवळ कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली

इमारत कोसळल्यानंतर लोकांनी मोठी गर्दी केली. घटनेच्या वेळचे अनेक व्हिडीओही पुढे येताना दिसत आहेत. इमारत कोसळल्याने पूर्ण राडा रस्त्यावर झाला आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे ज्यावेळी ही इमारत कोसळली, त्यावेळी जवळ कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आता प्रशासनाकडून शर्यतीचे प्रयत्न करून रस्ता मोकळा केला जाईल.

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल बघ्यांची गर्दी वाढली 

अचानक ही इमारत कोसळल्याने काही वेळ परिसरात भितीचे वातावरण बघायला मिळाले. मोठा आवाज आल्याने लोक घाबरली. त्यानंतर इमारत कोसळल्याचे समोर आले. लोकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. बघ्यांची मोठी गर्दी झाली असल्याचे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण इमारत चक्क काही सेकंदात पडली आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा