
मुंबईच्या मदनपुरा येथे एक इमारत कोसळण्याची माहिती मिळतंय. इमारत कमकुवत आणि फार जुनी झाली होती. पोलिस आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोणीही यामध्ये जखमी झाले नाही. पोस्ट ऑफिसच्या शेजारी ही इमारत होती. लोक रस्त्यावर होती, आपआपली काम करत असताना एक अत्यंत मोठा आवाज आला आणि धुरळा उडाला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी कोणाला काहीच कळत नव्हते. नेमके काय सुरू आहे.
मुंबईत चक्क पत्त्यासारखी पडली जुनी इमारत
चक्क पत्त्यासारखी ही जुनी इमारत पडली. इमारतीचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती मिळताच ब्रिगेड घटनास्थळी पोहोचले. इमारत जुनी होती, त्यामुळे याठिकाणी कोणी राहत नसल्याचे माहिती मिळतंय. यामुळे जखमी कोणीही झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या इमारतीच्या आजुबाजूला देखील काही इमारती आहेत. मात्र, त्यांचे काही नुकसान झाले नसल्याची माहिती मिळतंय.
सुदैवाने जवळ कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली
इमारत कोसळल्यानंतर लोकांनी मोठी गर्दी केली. घटनेच्या वेळचे अनेक व्हिडीओही पुढे येताना दिसत आहेत. इमारत कोसळल्याने पूर्ण राडा रस्त्यावर झाला आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाची बाब म्हणजे ज्यावेळी ही इमारत कोसळली, त्यावेळी जवळ कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आता प्रशासनाकडून शर्यतीचे प्रयत्न करून रस्ता मोकळा केला जाईल.
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल बघ्यांची गर्दी वाढली
अचानक ही इमारत कोसळल्याने काही वेळ परिसरात भितीचे वातावरण बघायला मिळाले. मोठा आवाज आल्याने लोक घाबरली. त्यानंतर इमारत कोसळल्याचे समोर आले. लोकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. बघ्यांची मोठी गर्दी झाली असल्याचे व्हायरल व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे. संपूर्ण इमारत चक्क काही सेकंदात पडली आहे.