AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वसई-विरारकरांना लवकरच 185 दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा

एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला सूर्या पाणी योजनेतील उदंचन केंद्राचे काम 98% आणि जलशुध्दीकरण केंद्राचे काम 94 % पूर्ण झाले आहे. लवकरच पहील्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे विरार-वसईकरांना मार्चनंतर मुबलक पाणी मिळणार आहे.

वसई-विरारकरांना लवकरच 185 दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा
SURYA1Image Credit source: socialmedia
| Updated on: Feb 01, 2023 | 5:15 PM
Share

मुंबई : वसई-विरार परिसरातील पाणी टंचाई लवकरच दूर होणार आहे. एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू केले आहे. या प्रकल्पातून नागरीकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मार्च 2023 मध्ये करण्याची योजना आहे. या पहिल्या टप्प्यातून वसई-विरार शहर महानगरपालिकेला 185 दशलक्ष लीटर क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल आहे. वसई-विरार परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध मिळावे यासाठी एमएमआरडीए  403 दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे.

सूर्या पाणी प्रकल्पातील उदंचन केंद्राचे काम 98% आणि जलशुध्दीकरण केंद्राचे काम 94 % पूर्ण झाले आहे. प्रकल्पात एकूण 88 किलोमीटरची पाईपलाईन टाकली जात आहे, तसेच प्रकल्पात दोन बोगदे असणार आहेत. त्यापैकी मेंढवणखिंड बोगद्याचे काम पूर्ण झाले असून तुंगारेश्वर बोगद्याचे काम जलदगतीने सुरू आहे. प्रकल्पाच्या पहिल्या भागाची 95 % प्रगती झाली आहे तर संपूर्ण प्रकल्प 82 % पूर्ण झाला आहे.

सूर्या प्रकल्प हा एमएमआरडीएचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, कारण पायाभूत सुविधा विकसित करण्यासोबतच एमएमआरडीए मुंबई महानगराच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी पहिला पाणीपुरवठा प्रकल्प साकारत आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातून मार्च 2023 मध्ये वसई-विरार शहर महानगरपालीकेला पाणी पुरवठा केला जाईल, तसेच दुसऱ्या टप्प्यातून मीरा-भाईंदर महानगरपालीकेला येत्या काही महिन्यांत 218 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणार असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

Follow Us
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरेंच्या विधानाने सगळेच अवाक्; धाराशिवमधील नगरसेवकांच्या बैठकीत असं काय घडलं?
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452 कोटी रुपये... नेमकं काय घडलं?