मुंबईत हक्काचं घर घेणं आणखी महागणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : मुंबईत घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे घर घेणे आता महागणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ करण्याचे विधेयक आज अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहे. स्टॅम्प ड्युटीच्या वाढीमुळे मुंबईकरांना आता नव्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या विधेयकानुसार स्टॅम्प ड्युटीत एका टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका अधिनियम विधेयक आज अधिवेशनात […]

मुंबईत हक्काचं घर घेणं आणखी महागणार
Follow us on

मुंबई : मुंबईत घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे घर घेणे आता महागणार आहे. कारण स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ करण्याचे विधेयक आज अधिवेशनात मंजूर करण्यात आले आहे. स्टॅम्प ड्युटीच्या वाढीमुळे मुंबईकरांना आता नव्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. या विधेयकानुसार स्टॅम्प ड्युटीत एका टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका अधिनियम विधेयक आज अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकात मोनो, मेट्रो, जलद बसच्या सेवेसाठी अतिरीक्त स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे. तसेच मुंबईतील घराच्या किंमतीतही आता वाढ होणार आहे. आधी सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जायची तिथे आता सात टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जाणार आहे.

इमारतीतील खरेदी-विक्री, भाडेतत्त्वावरील करार, बक्षीस पात्र करारनामा, गहाण ठेवलेली कागदपत्रे याकरिता स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. आता एक टक्का वाढ झाल्यामुळे स्टॅम्प ड्युटी सात टक्के होणार झाली आहे. नोटबंदीनंतर मुंबईतील रिअल इस्टेटमध्ये मंदीचे वातावरण असताना मुंबईत स्टॅम्प ड्युटीत होणार्‍या वाढीमुळे या धंद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईने मुंबईकरांची गळचेपी केली आहे. आता स्टॅम्प ड्युटीच्या वाढीमुळे याचा फटका घर खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. आजही मुंबईत अनेकजण स्त:चे घर घेण्याचे स्वप्न बघत आहे पण हे स्वप्न आता पूर्ण होण्याची शक्यता कमी दिसत आहे.