Sudhir Mungantiwar : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदेनी व्हावं, काँग्रेसनं असं म्हटलं तर, मुनगंटीवारांचा सवाल

| Updated on: Mar 16, 2022 | 2:47 PM

सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेकडे (Shivsena) आता सर्वसामान्यांचे प्रश्न राहिले नाहीत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

Sudhir Mungantiwar : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी एकनाथ शिंदेनी व्हावं, काँग्रेसनं असं म्हटलं तर, मुनगंटीवारांचा सवाल
सुधीर मुनंगटीवार यांची शिवसेनेवर टीका
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई: भाजप (BJP) नेते सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. शिवसेनेकडे (Shivsena) आता सर्वसामान्यांचे प्रश्न राहिले नाहीत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. जगातील सगळे शहाणे शिवसेनेतचं आहेत, असा टोला देखील सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. शिवसेनेला जनता त्यांची जागा दाखवून देईल, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर, सामनातून काँग्रेसबद्दल भाष्य केलं जातं. मात्र, काँग्रेसला काँग्रेसचं ठरवू द्या, असं देखील ते म्हणाले. तर, शिवसेना प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी नाही तर एकनाथ शिंदेंनी व्हावं असं जर कांग्रेस बोललं मग संजय राऊत काय करणार असा सवाल देखील मुनगंटीवार यांनी केला आहे.

जगातील सगळे शहाणे शिवसेनेतच

सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न शिवसेनेकडे राहिले नसल्याची टीका केलीय. भाजपचा विजय आभासी, आम्ही इश्वर चरणी प्रार्थना करू की असाच आभासी विजय होऊ द्या, त्यांचा असाच आभासी पराजय होऊ द्या, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. जगातले सगळे शहाणे शिवसेनेतच आहेत. त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असं देखील म्हणाले.

शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदेंनी व्हावं असं म्टटलं तर..

सामना शिवसेनेचं पॅम्पेलट आहे. काँग्रेसने काय करावं हे संजय राऊत सांगतात पण हे काँग्रेसला आवडत नाही. शरद पवारांनी यूपीएचं अध्यक्षपद भूषवावं असं म्हणतात, पण काँग्रेस ठरवेल ना त्यांना काय करायचंय, असं मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना प्रमुख ऊद्धव ठाकरेंनी नाही तर एकनाथ शिंदेंनी व्हावं असं जर काँग्रेस बोललं मग राऊत काय करणार असा सवाल देखील मुनंगटीवार यांनी केला आहे.

राज्यपाल संविधानिक पद आहे.त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही,असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. हिजाब प्रकरण भाजपने काढलं नाही, एकच गणवेश घालावा लागतो मग तो कुणीही असो, धर्म जात असं काही नसतं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

Womens World Cup 2022: भारत अडचणीत, सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? जाणून घ्या गुणतालिकेचं गणित